दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार
By admin | Published: February 21, 2017 08:53 AM2017-02-21T08:53:48+5:302017-02-21T11:25:35+5:30
राज्यातील जनतेचा कौल सांगणा-या १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठी मतदानाला सुरूवात झाली असून अनेक दिग्गजांनीही मतदानाचा अधिकार बजावला
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - राज्यातील जनतेचा कौल सांगणा-या १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठी मतदानाला सुरूवात झाली असून अनेक दिग्गजांनीही मतदानाचा अधिकार बजावला. मंगळवारी सकाळी मतदानाला सुरूवात होताच सरसंघचालच मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये मतदान केले तसेच नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. तर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गोरेगांव पूर्वेकडील बिंबीसार नगर येथे मतदान केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये तर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूरमध्ये मतदान केले. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही कुटुंबीयांसह मतदान केले.
तर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनेही मतदान करत सर्वांना आपला हक्क बजावण्याते आववाहन केले. तसेच ज्येष्ठ गीतकार गुलजार, अभिनेत्री रेखा, टीना अंबानी, ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी मतदान केले.
Started my morning by casting my https://t.co/Z817hxXwb7 is our duty towards our country & its progress.Pls go out&vote #VoteKarMaharashtrapic.twitter.com/fgXGxjkEcV
— Anushka Sharma (@AnushkaSharma) February 21, 2017
Mumbai: Tina Ambani casts her vote at a polling booth in Colaba, says she voted for good work in Mumbai city #BMCelectionpic.twitter.com/o2xj9IPhiO
— ANI (@ANI_news) February 21, 2017