आता विधान परिषदेतील ‘मदती’वरून संशयकल्लोळ; राज्यसभेच्या ‘बिघाडी’नंतर मविआचा सावध पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 05:57 AM2022-06-13T05:57:43+5:302022-06-13T05:58:00+5:30

राज्यसभा निवडणुकीतील फटक्यानंतर अपक्ष व छोट्या पक्षांना सोबत ठेवण्याची मोठी कसरत महाविकास आघाडीला करावी लागेल. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान आहे.

Legislative Council election mahavikas aghadi in full of precaution after rajya sabha election result | आता विधान परिषदेतील ‘मदती’वरून संशयकल्लोळ; राज्यसभेच्या ‘बिघाडी’नंतर मविआचा सावध पवित्रा

आता विधान परिषदेतील ‘मदती’वरून संशयकल्लोळ; राज्यसभेच्या ‘बिघाडी’नंतर मविआचा सावध पवित्रा

Next

गौरीशंकर घाळे

मुंबई :

राज्यसभा निवडणुकीतील फटक्यानंतर अपक्ष व छोट्या पक्षांना सोबत ठेवण्याची मोठी कसरत महाविकास आघाडीला करावी लागेल. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान आहे. दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी आवश्यक मतांची बेगमी झालेली असली तरी गाफील राहायचे नाही, कोणताही धोका पत्करायचा नाही, असा अत्यंत सावध पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. तर, राज्यसभेतील अपघातामुळे निर्माण झालेल्या अविश्वासाच्या वातावरणाने काँग्रेसची काळजी वाढवली आहे.

या निवडणुकीत विजयासाठी २७ मतांचा कोटा निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५५ आमदारांचे संख्याबळ असलेल्या शिवसेनेला दोन्ही उमेदवार निवडून आणण्यात अडचण राहणार नाही. तर, राष्ट्रवादीकडे ५३ मते आहेत. त्यातील अनिल देशमुख व नवाब मलिकांच्या मतांबाबत अद्याप साशंकता आहे. मात्र, अपक्ष समर्थकांच्या जोरावर आपले दोन उमेदवार निवडून आणण्यात राष्ट्रवादीला फारशी अडचण येणार नाही. 

शिवसेनेची शोधाशोध
0 राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेत चिंतेचे वातावरण आहे. 
0 आकड्यांचा खेळ कुठे फिरला, याचा शोध सध्या शिवसेनेच्या गोटात सुरू आहे. 
0 शिवसेना समर्थक अपक्षांनी आपली कामगिरी चोख बजावली. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे झुकलेल्या अपक्षांबाबत संशयाचे वातावरण आहे.

ताकही फुंकून पिण्याची आवश्यकता : खडसे
0 राज्यसभा निवडणुकीत गाफील राहून पराभव झाला. मात्र, विधान परिषदेला ताकही फुंकून प्यावे लागण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. 
0 परिषदेची तयारी करताना प्रत्येक गोष्ट तपासून आणि विश्वासाने करण्याची आवश्यकता आहे. सर्वांनी मागच्या पराभवाचा धडा घेऊन रणनीती ठरविण्याचे ठरवले आहे. अपक्षांवर अविश्वास दाखविणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

राऊत यांच्या निशाण्यावर अजित पवार समर्थक
0 शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आमदार देवेंद्र भुयार, आमदार संजय शिंदे, आमदार श्यामसुंदर शिंदे, कोल्हे या अपक्ष आमदारांची मते मिळाली नसल्याचा आरोप केला. हे तीनही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. 
0 त्यामुळे अपक्षांच्या आडून अजित पवारांना तर लक्ष्य करण्याचा प्रयत्न नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. बविआच्या तीन आमदारांचीही मते मिळाले नसल्याचे राऊत म्हणाले होते.

काँग्रेसला चिंता
राज्यसभा निवडणुकीत फटका बसल्याने महाविकास आघाडीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपली अतिरिक्त मते विशेषत: समर्थक अपक्षांची किती मते काँग्रेसकडे वळवतील, याबाबत शंकेचे वातावरण निर्माण 
झाले आहे. 

दुचाकी-तिचाकीचे काय ?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीक असलेल्या छोट्या पक्षांनी दिलेला शब्द पाळला नाही. एमआयएम, समाजवादी पार्टी अशा पक्षांकडून अपेक्षित असलेले एकही मते आले नसल्याचा शिवसेना नेत्यांचा समज आहे.

काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यास काँग्रेसला आणखी १२ ते १५ मतांची बेगमी करावी लागेल. 

 

Web Title: Legislative Council election mahavikas aghadi in full of precaution after rajya sabha election result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.