विधान परिषदेची निवडणूक रंगणार

By admin | Published: May 13, 2016 04:56 AM2016-05-13T04:56:17+5:302016-05-13T04:56:17+5:30

महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांनी विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १० सदस्यांची द्वैवाषिक निवडणूक येत्या १० जून रोजी घेण्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केले.

The Legislative Council elections will be played | विधान परिषदेची निवडणूक रंगणार

विधान परिषदेची निवडणूक रंगणार

Next

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांनी विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १० सदस्यांची द्वैवाषिक निवडणूक येत्या १० जून रोजी घेण्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केले. आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार १0 जून रोजी स. ९ ते दु. ४ या वेळात मतदान होईल व सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होऊन निकाल जाहीर होईल.
विधान परिषदेच्या ७ जुलै रोजी मुदत संपत असलेल्या १० सदस्यांच्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक होईल. सहा वर्षांपूर्वी निवडले गेलेले जे सदस्य निवृत्त होत आहेत त्यांत सर्वाधिक चार सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे, प्रत्येकी दोन सदस्य काँग्रेस व शिवसेनेचे, एक भाजपाचा तर एक अपक्ष आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)सभापती रामराजे प्रतापसिंग नाईक- निंबाळकर, विरोधी पक्षनेते धनंजय पंडितराव मुंडे, दीप्ती अशोक चवधरी व प्रकाश शंकर बिनसाळे (सर्व राष्ट्रवादी), सैयद मुजफ्फर हुसैन नाझर हुसैन व विजय कृष्णाजी सावंत (काँग्रेस), उद्योगमंत्री सुभाष राजाराम देसाई व परिवहनमंत्री दिवाकर नारायण रावते (शिवसेना), शोभाताई माधवराव फडणवीस (भाजपा) आणि विनायक तुकाराम मेटे (अपक्ष-शिवसंग्राम).

Web Title: The Legislative Council elections will be played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.