विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध होणार, काँग्रेसची माघार; मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 06:33 AM2020-05-11T06:33:21+5:302020-05-11T06:33:32+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: या निवडणुकीत उमेदवार आहेत. सध्या आपण कोरोनाचा मुकाबला करीत आहोत, अशा परिस्थितीत निवडणूक बिनविरोध व्हायला हवी म्हणून काँग्रेस एकच जागा लढवेल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
मुंबई : महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीनंतर काँग्रेसने विधान परिषदेची एकच जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ जणांची निवड बिनविरोध होणार, हे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: या निवडणुकीत उमेदवार आहेत. सध्या आपण कोरोनाचा मुकाबला करीत आहोत, अशा परिस्थितीत निवडणूक बिनविरोध व्हायला हवी म्हणून काँग्रेस एकच जागा लढवेल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
काँग्रेस दुसरी जागा लढणार असेल तर आम्हीही पाचवी जागा लढवू, अशी भूमिका घेत भाजपने उमेदवारी अर्ज तयार ठेवला होता. मात्र आता आम्ही पाचवी जागा लढणार नाही, असे भाजपच्या सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीवर आणखीच शिक्कामोर्तब झाले. आता भाजपचे ४, शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येईल.
काँग्रेसने राजेश राठोड आणि राजकिशोर (पापा) मोदी या दोन उमेदवारांची घोषणा शनिवारी केली होती. मात्र आता फक्त राजेश राठोड हेच काँग्रेसचे उमेदवार असतील. त्यांच्या नावाची घोषणा अखिल भारतीय काँग्रेसने आधीच केली आहे, तर राष्टÑवादी काँग्रेसने माजी मंत्री शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी यांना उमेदवारी दिली आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर आज सायंकाळी दीड तास शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे एकनाथ शिंदे, संजय राऊत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण हे (पान ५ वर)
यांची होणार निवड
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, डॉ. नीलम गोºहे (शिवसेना), शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी (राष्ट्रवादी), राजेश राठोड (काँग्रेस), रणजीतसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछेडे आणि प्रवीण दटके (भाजप).