विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर

By Admin | Published: September 29, 2016 06:34 AM2016-09-29T06:34:50+5:302016-09-29T06:34:50+5:30

विधान परिषदेच्या पाच जागांसाठीची निवडणूक आता लांबणीवर पडली आहे. विद्यमान आमदारांची मुदत संपल्यानंतर निवडणूक होईल. त्यामुळे काही दिवस या जागा रिक्तदेखील राहतील.

Legislative election postponed | विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर

विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर

googlenewsNext

मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठीची निवडणूक आता लांबणीवर पडली आहे. विद्यमान आमदारांची मुदत संपल्यानंतर निवडणूक होईल. त्यामुळे काही दिवस या जागा रिक्तदेखील राहतील.
गृहराज्यमंत्री रणजित पाटील (अमरावती पदवीधर), सुधीर तांबे (नाशिक पदवीधर), विक्रम काळे (औरंगाबाद शिक्षक), ना. गो. गाणार (नागपूर शिक्षक), रामनाथ मोते (कोकण शिक्षक) या पाच विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या १२ डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे या जागांसाठी येत्या नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते. तथापि, १ आॅक्टोबरपासून या मतदारसंघांच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचे काम निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे. हे काम ७ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. त्यामुळे १२ डिसेंबरपूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करणे
शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकृत सूत्रांनी आज लोकमतला सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

नव्याने मतदार याद्या
विद्यमान पाच आमदारांचा कार्यकाळ मात्र १२ डिसेंबरलाच संपेल. त्यानंतर निवडणुकीपर्यंत या जागा रिक्त राहतील. २०११ मधील मतदार याद्यांनुसार ही निवडणूक घेता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. कारण दर निवडणुकीच्या आधी मतदार याद्या नव्याने तयार कराव्यात असा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे.

२०१७मध्ये पाचही जागांसाठी निवडणूक
आयोगाच्या सूत्रांनी असेही स्पष्ट केले की, आम्ही या निवडणुकांचा कोणताही कार्यक्रम जाहीर केलेला नव्हता. आता मतदार याद्यांच्या पुनर्रचनेनंतर साधारणत: जानेवारी ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान पाचही जागांसाठी निवडणूक होईल, अशी शक्यता आहे.

या निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा आधीच करण्यात आली आहे. तथापि, आता मतदार याद्या तयार होताना आपापल्या मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी कशी होईल आणि आधीचे कसे गळणार नाहीत, याची दक्षता उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना घ्यावी लागणार आहे.

Web Title: Legislative election postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.