आमदारच मारतात विधानसभेत ‘पिचकारी’

By admin | Published: July 2, 2015 12:34 AM2015-07-02T00:34:10+5:302015-07-02T00:34:10+5:30

सर्वसामान्यांना सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे व तंबाखू खाऊन थुंकण्यास तीन हजारांचा दंड करण्याचा कायदा असताना अधिवेशनकाळात विधिमंडळ परिसरात

Legislators kill MLAs | आमदारच मारतात विधानसभेत ‘पिचकारी’

आमदारच मारतात विधानसभेत ‘पिचकारी’

Next

नाशिक : सर्वसामान्यांना सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे व तंबाखू खाऊन थुंकण्यास तीन हजारांचा दंड करण्याचा कायदा असताना अधिवेशनकाळात विधिमंडळ परिसरात चक्क आमदारच सिगारेट ओढतात आणि विधानसभेत सभागृहात पिचकाऱ्या मारतात, असा गौप्यस्फोट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे केला.
जिल्हा परिषदेत कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाजन यांनी शेतकऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात त्यांनी अनेक किस्से सांगितले. हागणदारीमुक्त अभियान राबवित असताना खान्देशात मात्र लोक गावोगावी रस्त्याच्या कडेला उघड्यावर शौचास बसलेले दिसतात.
परदेशात स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व असून, साधा कागदाचा तुकडाही रस्त्यावर फेकला जात नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास
आणि धूम्रपान करण्यास दंड
आहे, असे सांगितले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही
भारत सरकारच्या स्वच्छता कार्यक्रमाच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व धूम्रपान करणाऱ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये
दंड आणि तीन महिने साफसफाई व स्वच्छता करण्याची
शिक्षा करण्याचा कायदा केला. मात्र हा निर्णय होत नाही तोच बाहेर व्हरांड्यात दोन
आमदार धूम्रपान करत असल्याचे वृत्त वाहिन्यांवर झळकल्याची त्यांनी आठवण करून दिली.
एवढेच नव्हे विधानसभेत कामकाज सुरू असताना
काही मंडळी स्वच्छ कारपेटवर चक्क पिचकारी मारत असल्याचे आढळून आले आहे.
एकीकडे सर्वसामान्यांना सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान
करण्यास दंड असताना दुसरीकडे आमचीच मंडळी पिचकाऱ्या
मारत असल्याने कपाळावर हात मारून घेण्याची वेळ येते, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Legislators kill MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.