जीएसटीसाठी विधिमंडळाचे अधिवेशन

By admin | Published: April 26, 2017 02:25 AM2017-04-26T02:25:38+5:302017-04-26T02:25:38+5:30

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयकासह (जीएसटी) संबंधित इतर विधेयकांना मंजुरी देण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

Legislature session for GST | जीएसटीसाठी विधिमंडळाचे अधिवेशन

जीएसटीसाठी विधिमंडळाचे अधिवेशन

Next

मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयकासह (जीएसटी) संबंधित इतर विधेयकांना मंजुरी देण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन १७ मे रोजी घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. संसदेने केंद्रीय वस्तू व सेवा कर विधेयक तसेच एकात्मिक वस्तू व सेवा कर विधेयक पारित केले असून त्यास राष्ट्रपतींनी संमती दिली आहे.
घटनात्मक तरतुदीनुसार केंद्र व राज्यास वस्तू व सेवांवर कर लावण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्या अधिकारांतर्गत राज्याच्या विधानमंडळाने वस्तू व सेवा कर विषयक विधेयक पारित करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हे विशेष अधिवेशन होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Legislature session for GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.