विधिमंडळाचे अधिवेशन तीन आठवड्यांचे
By admin | Published: June 22, 2016 04:21 AM2016-06-22T04:21:50+5:302016-06-22T04:21:50+5:30
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत असून ते तीन आठवडे चालेल. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत असून ते तीन आठवडे चालेल. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. या अधिवेशनात शासकीय कामकाजाशिवाय एकूण तेरा अध्यादेश मांडण्यात येणार असून ८ नवीन अध्यादेश मांडण्यात येणार असून ३ जुनी व २ नवीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. ५ आॅगस्टपर्यंतचे तात्पुरते कामकाज ठरविण्यात आले आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा व पुढे चालू ठेवणे), महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा व दुसर्यांदा पुढे चालू ठेवणे), महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन , महाराष्ट्र महानगरपालिका आण िमहाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची तरतूद करणे, नगराध्यक्षांची थेट निवडणुकीने निवड करणे याबाबत तरतुदी), महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) आदी अध्यादेश मांडण्यात येणार आहेत. प्रस्तावित विधेयके पुढील प्रमाणे - १) मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक.२) महाराष्ट्र डाळ (किंमतीचे नियमन व नियंत्रण) विधेयक. प्रलंबित विधेयके पुढील प्रमाणे - १) महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक. २) महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन). ३) महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक. (विशेष प्रतिनिधी)