पैशांच्या चणचणीमुळं लोणंदचा कांदा बाजार बंद !

By admin | Published: November 13, 2016 09:33 PM2016-11-13T21:33:57+5:302016-11-13T21:33:57+5:30

व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन सोमवार, दि. १४ व गुरुवार, दि. १७ चा कांदा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Lemon juice onion market closed due to the rupture of money! | पैशांच्या चणचणीमुळं लोणंदचा कांदा बाजार बंद !

पैशांच्या चणचणीमुळं लोणंदचा कांदा बाजार बंद !

Next

आॅनलाइन लोकमत
लोणंद (सातारा), दि. 13 - कांदा लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नसल्याने लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन सोमवार, दि. १४ व गुरुवार, दि. १७ चा कांदा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी बिपिन शहा, पंकज शहा, इकबाल काझी, मनसुखलाल शहा, मदन शहा, दिलीप परदेशी, हनुमंत क्षीरसागर, देवराज बुटियानी, महेश भोयरे, प्रशांत चव्हाण आदी व्यापारी उपस्थित होते. पाचशे, हजारांच्या नोटा मंगळवारी रद्द ठरवल्या. त्यानंतर जुन्या नोटा बँकेतून बदलण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली असली तरी बँकांमधून मिळणारे पैसे शेतकऱ्यांना देण्याइतके नाहीत. आणि शेतकरी पाचशे, हजारांच्या जुन्या नोटा स्वीकारणार नाहीत. त्यामुळे कांदा बाजार बंद ठेवावा लागत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले.
लोणंदच्या बाजारात लोणंद, खंडाळा, शिरवळ, फलटण येथील शेतकऱ्यांनी कांदा आणला तरी त्यांना गाडी भाडे, हमाली, वारणी देण्यासाठीही पुरेसे पैसे नाहीत. तसेच लोणंद ही कांद्यासाठी मोठी बाजारपेठ असून, येथून दिल्ली, राजपूर, पंजाब, कलकत्ता, जयपूर, कर्नाटक येथे कांदा निर्यात केला जातो. केवळ पुरेसे पैसे नसल्याने बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला.

शेतकऱ्यांकडील माल खराब होऊ नये म्हणून उधार किंवा धनादेशने व्यवहार केला तरी गाडी भाडे, हमाली, वारणी देण्यासाठीही पैसे पुरत नाहीत. एका व्यापाऱ्याकडे किमान एक हजार पिशवी कांदा आवक झाली तरी त्याला पाच लाख रुपये भांडवल लागते. ते त्यांच्याकडे उपलब्ध नाही.
- बिपिन शहा, व्यापारी

कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी बाजार बंद ठेवणार आहेत. तरी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी व्यापारी शेतकरी हमाल, आडते यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यातून मार्ग काढला जाईल. तसेच बाजार समितीमधील सर्व बाजार सुरू राहतील.
- राजेंद्र तांबे, सभापती

Web Title: Lemon juice onion market closed due to the rupture of money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.