अहमदनगरमधील निंबोडीची शाळा कोसळली; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 06:32 PM2017-08-28T18:32:26+5:302017-08-28T19:17:23+5:30

Lemonade school in Ahmednagar collapses; Two students die | अहमदनगरमधील निंबोडीची शाळा कोसळली; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

जखमी विद्यार्थी

Next

अहमदनगर, दि. 28 - नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पावसामुळे पडली असून, या शाळेत ३५ विद्यार्थी अडकले होते़ त्यापैकी १६ विद्यार्थी जखमी झाले असून, मयतांची संख्या दोनवरुन वाढून आता तीन झाली आहे.
नगर तालुक्यातील निंबोडी येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेची इमारती जुनी झाली होती. सलग दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे या शाळेची इमारती कोसळली. त्यामुळे सुमारे ३५ विद्यार्थी शाळेत अडकले होते़ त्यातील मंथन उमेश साठे, आरती विजय निंबाळकर, कैश्यब शेख, प्रज्वल सुशांत भिंगारदिवे, प्रथम अशोक पवार, सनी सुभाष साठे, गौरव कृष्णा वाघुले, संचिता संतोष भिंगारदिवे, शरद शिवाजी राठोड, नेट संजय वैरागर, शिक्षिका लिना सुभाषचंद्र पाटील हे जखमी झाले आहेत़
दरम्यान सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलाचाही मृत्यू झाला आहे़ त्यामुळे खासगी हॉस्पिटलमधील दोन व आता सिव्हील हॉस्पिटलमधील एक अशा एकूण तीन मुलांचा मृत्यू झाला आहे़ इतर दोघाची प्रकृती गंभीर आहे़
शाळा पडल्याची माहिती जिल्हा परिषदेत समजताच जिल्हा परिषदेत एकच धावपळ उडाली. जिल्हा परिषदेने तातडीने एक रुग्णवाहिका निंबोडीला रवाना केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, शिक्षणाधिकारी काटमोरे, आरोग्य अधिकारी नागरगोजे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले़ अडकलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले़
जखमी मुलांवर प्राथमिक उपचार करुन त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात तसेच इतर खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले़

Web Title: Lemonade school in Ahmednagar collapses; Two students die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.