‘समृद्ध जीवन’च्या लीना मोतेवार पोलीस कोठडीत

By Admin | Published: August 12, 2016 04:02 AM2016-08-12T04:02:55+5:302016-08-12T04:02:55+5:30

समृद्ध जीवन फुडस् इंडिया या कंपनीची संचालक लीना महेश मोतेवार यांनी पुण्यातील सराफाकडून एकूण १ कोटी ६२ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी

Lena Motewar police custody of 'Rich Life' | ‘समृद्ध जीवन’च्या लीना मोतेवार पोलीस कोठडीत

‘समृद्ध जीवन’च्या लीना मोतेवार पोलीस कोठडीत

googlenewsNext

पुणे : समृद्ध जीवन फुडस् इंडिया या कंपनीची संचालक लीना महेश मोतेवार यांनी पुण्यातील सराफाकडून एकूण १ कोटी ६२ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी केल्याचे राज्य गुन्हे अन्वेषणने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे़ महेश मोतेवारलाअटक झाल्यानंतर त्या दुसऱ्याच्या नावावर भाड्याने घेतलेल्या घरात रहात असल्याची माहिती मिळाल्यावर सीआयडीने बुधवारी त्या ठिकाणाहून अटक केली़ विशेष न्यायालयाने अधिक तपासासाठी लीना यांना २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
समृद्ध जीवन फूड इंडिया या कंपनीविरुध्द राज्यातील विविध जिल्ह्यासह अनेक राज्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत़ सर्व आर्थिक गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे़ चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात सीआयडीने लीना मोतेवार (वय ३७, रा़ विद्यादीप सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी) यांना अटक केली़ या प्रकरणात महेश मोतेवार आणि राजेंद्र भंडारी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस़ जे़ काळे यांच्या न्यायालयात सीआयडीने गुरुवारी लिना मोतेवार यांना हजर केले़ अतिरिक्त जिल्हा सरकारी वकिल सुनील हांडे यांनी सांगितले की, लिना मोतेवार या कंपनीची ५० टक्के शेअर होल्डर होती़ २०१३ मध्ये त्यांच्याकडे १ लाख ६२ हजार ५०० शेअर्स असून त्यापैकी हा १७़११ टक्के हिस्सा आहे़ कंपनीच्या वाहनचालकाच्या घरी ठेवलेले १ कोटी रुपयांचे दागिने आरोपीचे असून त्याबाबत तपास करायचा आहे़ धनकवडी येथील घरात आरोपीच्याच फिंगर प्रिंटने लॉकर उघडले जाऊ शकते अशीच आणखीही लॉकर असण्याची शक्यता आहे. महेश मोतेवार अटकेत असताना आरोपीने कंपनीशी निगडीत असलेल्या विविध मालमत्ताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत़ कंपनीने त्यांना २००८-०९ ते २०१३ -१४ दरम्यान २० कोटी रुपयांचे कर्ज व अग्रीम स्वरुपात देण्यात आले आहे़ तसेच पगाराच्या स्वरुपात ६३ लाख रुपये दिले आहेत़ या रक्कमा कोणत्या उद्देशाने दिल्या, याचा तपास करायचा आहे़ गुंतवणुकदारांकडून गोळा केलेल्या पैशातून स्वत: करीता, कुंटुबाकरीता स्थावर मिळकती, जंगम मालमत्ता खरेदी केली आहे, त्याचा तपास करायचा आहे़ वेगवेगळ्या राज्यात गुंतवणुक केली आहे़ त्याचा तपास करायचा आहे़ न्यायालयाने अधिक तपासासाठी २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़ (प्रतिनिधी)

समृद्ध जीवन फुडस् कंपनीची लिना मोतेवार ५० टक्के शेअर होल्डर
महेश मोतेवार यांच्या अटकेनंतर कंपनीची मालमत्ताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न
संचालक असलेल्या लीना मोतेवारला कंपनीनेच दिले २० कोटींचे कर्ज
कंपनी ग्राहकांची संख्या व उपलब्ध लाईव्ह स्टॉकची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत
पुण्यातील प्रसिद्ध सराफाकडील खाते उताऱ्यानुसार ४४ वेगवेगळ्या व्यवहारातून १ कोटी ६२ लाख रुपयांची सोने, हिऱ्याच्या दागिन्यांची खरेदी

Web Title: Lena Motewar police custody of 'Rich Life'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.