आघाडी लांबल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला

By admin | Published: January 30, 2017 12:21 AM2017-01-30T00:21:41+5:302017-01-30T00:21:41+5:30

पुणे : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील युती फुटल्याने शिवसेनेने जल्लोष केला़, तर त्याच वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीची चर्चा लांबत चालल्याने

Lengthening the lead, the life of want | आघाडी लांबल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला

आघाडी लांबल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला

Next

पुणे : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील युती फुटल्याने शिवसेनेने जल्लोष केला़, तर त्याच वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीची चर्चा लांबत चालल्याने, दोन्ही पक्षांतील इच्छुकांच्या जीव टांगणीला लागला आहे़
मागील महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्येच लढत झाली होती़ त्यामुळे हे प्रभाग आपल्याकडे हवेत, अशी दोन्ही पक्षांची मागणी आहे़ आघाडीची चर्चा सुरू होण्यापूर्वी अनेकांना पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याने त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे, पण अचानक आघाडीची चर्चा सुरू झाली़ आघाडीसाठी अजित पवार हे स्वत: इच्छुक असल्याने, काँग्रेससाठी आणखी काही जागा सोडण्याची तयारी दाखविली जात आहे, परंतु काही जागांबाबत दोन्ही पक्ष आग्रही आहेत़ आपल्या जागेबाबत दोन्ही पक्ष आग्रही असल्याचे समजल्याने दोन्ही पक्षांतील इच्छुकांचे मात्र धाबे दणाणले आहे़ त्यांनी प्रचार थांबवून वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे़
रात्री उशिरापर्यंत आघाडीच्या बैठकीत नेमके काय ठरले़ आपला प्रभाग कोणाला सुटला याची खात्री इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांकडून केली जात होती़
दुसरीकडे ज्यांना आपण प्रचाराला लागा, असे सांगितले, त्यांनाच आता थांबा आणि वाट पाहा, असे सांगण्याची वेळ दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांवर आली आहे़

Web Title: Lengthening the lead, the life of want

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.