कसवण परिसरात बिबट्याचा संचार
By admin | Published: October 4, 2015 02:33 AM2015-10-04T02:33:36+5:302015-10-04T02:33:36+5:30
तालुक्यातील कसवण-तळवडे मार्गावर तसेच कणकवली-नरडवे मार्गावर बिबट्याचा मुक्त संचार सुरु आहे. तरी या बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी या परिसरातील
कणकवली : तालुक्यातील कसवण-तळवडे मार्गावर तसेच कणकवली-नरडवे मार्गावर बिबट्याचा मुक्त संचार सुरु आहे. तरी या बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ, वाहनचालकांतू करण्यात येत आहे.
कणकवली येथे काम करणारे कसवण येथील विवेक नरसाळे आणि अक्षय घाडीगावकर हे दोघे युवक गुरुवारी रात्री आपले काम संपल्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास या मार्गावरुन आपल्या घरी जात असताना कसवण जांभळीचा माळ (खोतांची बाग) येथे रस्त्यावरच बिबट्या बसलेला दृष्टीस पडला. या घटनेने दोघेही भयभीत झाले. मात्र, दोघेही दुचाकीवर असल्याने बिबट्याच्या बाजूने काळोखातून त्यांनी कसवणकडे धूम ठोकली. मात्र तो झोपेत असल्याने अनर्थ टळला. या घटनेने कसवण, तळवडे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी या मार्गावर मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ, तसेच वाहनचालकांतून होत आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी कणकवली-नरडवे मार्गावरही करंजे खिंडीजवळ काही युवकांना बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे या दोन्ही ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार असल्याने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. (प्रतिनिधी)