मुंबईत पावसाळ्यात लेप्टोचा धोका

By admin | Published: July 1, 2016 07:38 PM2016-07-01T19:38:18+5:302016-07-01T19:38:18+5:30

मलेरियाच्या बरोबरीनेच पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिस हा आजारही मोठ्या प्रमाणात पसरतो़ या आजाराचा प्रमुख वाहक असलेल्या उंदरांचा संहार करण्याची मोहीम पालिकेने हाती

Leopto risk in monsoon in Mumbai | मुंबईत पावसाळ्यात लेप्टोचा धोका

मुंबईत पावसाळ्यात लेप्टोचा धोका

Next

- उपनगरात मात्र मूषक संहारक नाहीत

- पाच महिन्यांत शहरात ९३ हजार मूषकांचा संहार

मुंबई, दि. १ -  मलेरियाच्या बरोबरीनेच पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिस हा आजारही मोठ्या प्रमाणात पसरतो़ या आजाराचा प्रमुख वाहक असलेल्या उंदरांचा संहार करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली होती़. गेल्या पाच महिन्यांत शहर भागातच ९३ हजार ६४३ उंदीर मारण्यात आले आहेत़.  मात्र उपनगरामध्ये पालिकेला मूषक संहारक मिळालेले नाहीत़. त्यामुळे लेप्टोचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या पश्चिम उपनगरातील नागरिक हवालदिल झाले आहेत़.  गेल्या पावसाळ्यात लेप्टोच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती़ सर्वाधिक रुग्ण पश्चिम उपनगरातच आढळून आले होते़. जनावरांच्या मलमुत्रापासून लेप्टो फैलावत असल्याने नुकतेच तबेलेवाल्यांना पालिकेने नोटीस पाठवून स्वच्छता राखण्याची ताकीद दिली होती़. मुंबई शहरात उंदीर मारण्यासाठी पालिकेने विशेष पथक नेमले आहे़. या पथकाने जानेवारी ते मार्च २०१६ पर्यंत ९३ हजार ६५३ उंदीर मारले़ यापैकी सर्वाधिक २३ हजार ६१२ उंदीर मोहम्मद अली रोड, सॅण्डहर्स्ट रोड, मस्जिद बंदर या भागात मारण्यात आले आहेत़. एकीकडे शहरात ही मोहीम तेजीत असताना उपनगरांमध्ये मात्र मूषक संहारक पालिकेला सापडलेले नाहीत़ प्रत्येक उंदरापाटी दहा रुपये मोजण्याची पालिकेने तयारी दाखविली़ तरीही कोणती संस्था अथवा व्यक्ती पुढे आलेले नाहीत़. विशेष म्हणजे गेल्या वर्षी पश्चिम उपनगरातच लेप्टोचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते़ (प्रतिनिधी)

-  जानेवारी ते मे महिन्यापर्यंत ९३ हजार ६५३ उंदीर मारले़.

- सॅण्डहर्स्ट रोड, मस्जिद बंदर या विभागात सर्वाधिक २३ हजार ६१२ उंदीर मारण्यात आले आहेत़.

- जनावारांच्या मलमूत्र पायाच्या जखमेवाटे शरीरात शिरल्यास लेप्टोचा संसर्ग होतो़.

- उपनगरांमध्ये सर्वाधिक तबेले असून यातून जनावारांचे मलमूत्र पाण्यातून वाहत जाते़. त्यामुळे उपनगरांमध्ये लेप्टोचा धोका असतो़.

Web Title: Leopto risk in monsoon in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.