यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 06:05 AM2019-05-22T06:05:37+5:302019-05-22T06:05:44+5:30

पंचांगकर्त्यांचा एक्झिट पोल : दा. कृ. सोमण यांचा अंदाज

Less than average rainfall this year | यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

Next

ठाणे : एकीकडे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच एक्झिट पोलच्या माध्यमातून पुन्हा सत्तेत कोण येणार, याचे अंदाज बांधले जात आहेत. त्यातच आधुनिक विज्ञानामुळे पावसाचा नेमका अंदाज वर्तविणे वेधशाळेला सोपे झाले असले, तरी अजूनही ग्रह, नक्षत्रांच्या आकाशातील स्थानांनुसार पंचांगात वर्तविण्यात आलेले भाकीत पडताळून पाहणारा फार मोठा वर्ग आहे. त्यानुसार, आता पंचांगकर्त्यांनीसुद्धा आता पावसाचा एक्झिट पोल दिला आहे.


यंदा वेधशाळेप्रमाणेच पंचांगामधूनही पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याचा अंदाज असल्याची माहिती ज्येष्ठ पंचागकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. पंचांगकर्ते पुढील वर्षीच्या पावसाचा अंदाज आधीच व्यक्त करीत असतात. पर्जन्य नक्षत्रे आणि त्यांचे वाहने यावरून पावसाचा अंदाज बांधला जातो.


पंचांगातील पावसाचे अंदाज हे केवळ ठोकताळे असतात. अनेक वर्षांच्या निरीक्षणातून ते मांडलेले असतात. ते कधी चुकतात, तर कधी बरोबर येतात. वेधशाळांच्या अंदाजांप्रमाणे ते वैज्ञानिक निकषावर आधारलेले नसले, तरी समाजातील एक मोठा वर्ग या नक्षत्रांवर पावसाचा अंदाज बांधत असतो, असेही सोमण यांनी स्पष्ट केले.


असा बांधला जातो अंदाज!
च्मृग - ८ जून ते २१ जून, वाहन - उंदीर
च्आर्द्रा - २२ जून ते ०५ जुलै, वाहन - हत्ती
च्पुनर्वसू - ०६ जुलै ते १९ जुलै, वाहन - मेंढा
च्पुष्य - २० जुलै ते ०२ आॅगस्ट, वाहन - गाढव
च्अश्लेषा- ०३ आॅगस्ट ते १६ आॅगस्ट, वाहन - बेडूक
च्मघा - १७ आॅगस्ट ते ३० आॅगस्ट, वाहन- उंदीर
च्पूर्वा फाल्गुनी - ३१ आॅगस्ट ते १२ सप्टेंबर, वाहन- घोडा
च्उत्तरा फाल्गुनी- १३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर, वाहन- मोर
च्हस्त - २७ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर, वाहन- गाढव
च्चित्रा - ११ आॅक्टोबर ते २३ आॅक्टोबर, वाहन- बेडूक
च्स्वाती- २४ आॅक्टोबर ते ०५ नोव्हेंबर, वाहन- उंदीर

च्ही सर्व सूर्य नक्षत्रे आहेत. सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करेल, त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्रनक्षत्रापर्यंत नक्षत्रसंख्या मोजावी. त्या संख्येस ९ ने भागावे. जी बाकी राहील, तिच्यावरून वाहने जाणावीत. वाहने ठरविण्याचा नियम हा असा आहे. शून्य बाकी राहिली, तर हत्ती वाहन असते. १ घोडा, २ कोल्हा, ३ बेडूक, ४ मेंढा , ५ मोर, ६ उंदीर, ७ म्हैस, ८ गाढव अशी वाहने असतात.


च्बेडूक, म्हैस व हत्ती वाहन असता खूप पाऊस पडतो. मोर, गाढव, उंदीर वाहन असताना अनियमित आणि कमी पाऊस पडतो. कोल्हा व मेंढा वाहन असता अल्प पाऊस पडतो. घोडा वाहन असताना पर्वतावर पाऊस पडतो, असे सांगण्यात आले आहे.

Web Title: Less than average rainfall this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.