'पाच वर्षांपेक्षा नीचांकी पाऊस

By admin | Published: August 9, 2015 08:58 PM2015-08-09T20:58:51+5:302015-08-09T20:58:51+5:30

आॅगस्टपर्यंतची सरासरी : २०१३ मध्ये सर्वांत जास्त पाऊस

'Less than five years of rainfall | 'पाच वर्षांपेक्षा नीचांकी पाऊस

'पाच वर्षांपेक्षा नीचांकी पाऊस

Next

अनंत जाधव -सावंतवाडी तालुक्यात गेल्या पाच वर्षांतील आॅगस्टपर्यंतचा सर्वांत नीचांकी पाऊस यावर्षी पडल्याचे महसूल विभागाच्या पर्जन्य मोजणीतून पुढे आले आहे. आॅगस्ट २0१३ मध्ये सर्वाधिक ३३१७ मिलिमीटर पावसाची नोंद असून, तोच पाऊस यावर्षी निम्म्यावर आला असून, फक्त १७७५ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन महिन्यांत पाऊस आपली सरासरी पूर्ण करेल.
जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडत असल्याचे सांगितले जाते. दाट झाडी तसेच डोंगरदऱ्या, पश्चिम घाटातील प्रदेश, आंबोलीच्या पायथ्याचे गाव अशी अनेक वर्णने सावंतवाडी तालुक्याविषयी केली जातात. गेल्या पाच वर्षांत पावसानेही चांगली हजेरी लावत या सर्व बाबी खऱ्या ठरविल्या होत्या. मात्र, यावर्षी पावसाने या सर्व शक्यतांवर पाणी फेरले आहे. गेल्या पाच वर्षांत पावसाची सरासरी वाढणार, असे वाटत असतानाच ती आता अर्ध्याहून कमी पावसावर येऊन ठेपली आहे.
सावंतवाडी तालुक्यात २०११ मध्ये २९७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, तर २०१२ मध्ये २२५० मिलिमीटर, २०१३ मध्ये ३३१७ मि.मी. एवढी असून, २०१४ मध्ये २२०१ मिलिमीटर, तर यावर्षी २०१५ मध्ये सर्वांत कमी १७७५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात गेल्या चार वर्षांत आॅगस्टपर्यंत सरासरी दोन हजार मिलिमीटर पाऊस कोसळला. मात्र, यावर्षी २०१३ मधील पावसापेक्षा निम्माही पाऊस पडला नाही. आंबोलीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाची सरासरी कायम आहे; पण त्या प्रमाणात सावंतवाडी तालुक्यात पावसाला ही सरासरी गाठण्यात यश मिळाले नाही.
दरम्यान, महसूल विभागाच्या पर्जन्यमापन अधिकाऱ्यांनी सांगितले की, आॅगस्टपर्यंतच्या पावसाची सरासरी घटली असली तरी पुढील दोन महिन्यांत पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजची सरासरी ही पुढील काही काळात मागील काही वर्षांशी मिळतीजुळती होईल, अशी शक्यता वर्तविली आहे.++

सावंतवाडीत संततधार
गेले चार दिवस अधूनमधून पडणाऱ्या पावसाने सावंतवाडी तालुक्यासह शहरात रविवारी पहाटेपासूनच संततधार बरसण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: 'Less than five years of rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.