एसटी महामंडळाच्या स्लीपर शिवशाहीच्या भाड्यामध्ये कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 08:28 PM2019-02-08T20:28:18+5:302019-02-08T20:29:34+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने वातानुकूलित स्लीपर शिवशाही बसच्या प्रवासभाड्यात ३ रुपये ८५ पैशांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

less in The sleeper shivshahi rate | एसटी महामंडळाच्या स्लीपर शिवशाहीच्या भाड्यामध्ये कपात

एसटी महामंडळाच्या स्लीपर शिवशाहीच्या भाड्यामध्ये कपात

Next
ठळक मुद्देएसटी महामंडळाकडून वातानुकूलित स्लीपर शिवशाही बसकडे प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने वातानुकूलित स्लीपर शिवशाही बसच्या प्रवासभाड्यात ३ रुपये ८५ पैशांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पुर्वी या बसला प्रति टप्पा १५ रुपये २० पैसे मोजावे लागत होते. तसेच या बसचे भाडे यापुढे पाच रुपयांच्या पटीत आकारले जाणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याचे भाडे १५ रुपये असेल. तर लहान मुलांसाठी पाच रुपये भाडे आकारले जाईल.
एसटी महामंडळाकडून वातानुकूलित स्लीपर शिवशाही बसकडे प्रवाशांना अधिक आकर्षित केले जात आहे. त्याअंतर्गत प्रवास भाडे कपातीसाठीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाला दिला होता. या प्रस्तावाला प्राधिकरणाने नुकतीच मंजुरी दिली. त्यानुसार सुधारीत भाडे दर दि. १३ फेब्रुवारीपासून लागु होणार आहेत. या बसचे सध्याचे दर प्रति टप्पा १५ रुपये २० पैसे आहेत. त्यामध्ये ३ रुपये ८५ पैशांची कपात करून ते ११ रुपये ३५ पैसे करण्यात आले आहेत. यामध्ये जीएसटी व इतर करांचा समावेश केल्यास हे भाडे १२ रुपये ८९ पैसे होते. मात्र, महामंडळाने भाडे दर पाच रुपयांच्या पटीत केला आहे. त्यानुसार अडीच रुपये ते पाच रुपयांपर्यंतची आकारणी पाच रुपये म्हणून करण्यात येईल. या सुधारीत दरानुसार प्रवाशांना पहिल्या टप्प्यासाठी १५ रुपये मोजावे लागतील. त्यानंतरच्या पुढील प्रत्येक टप्यासाठीही पाचच्या पटीतच भाडे आकारले जाणार आहे. 
सुधारीत दरानुसार दुसºया टप्प्यासाठी २४.७७ रुपये भाडे होते. पण पाचच्या पटीत २५ रुपये भाडे होईल. यानुसार तिसºया टप्प्यासाठी ३६.६६ रुपये होणारे भाडे ३५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. याच निकषाप्रमाणे पुढील भाडे दर ठरविण्यात आले आहेत. स्लीपर शिवशाही बसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येणाºया सवलतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 
--------------
असे असतील सुधारीत दर (रुपयांत)
किमी        दर
६        १५
१०२        २०५
१५०        ३००
२०४        ४०५
२५२        ५००
३००        ५९५
३५४        ७००
४०२        ७९५
४५०        ८९०
५०४        १०००
६००        ११९०
७०२        १३९०
८०४        १५९५
९००        १७८५
---------------------

Web Title: less in The sleeper shivshahi rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.