उन्हाळी कांदा लागवडीकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:08 PM2019-05-11T23:08:58+5:302019-05-11T23:09:16+5:30
मेशी : यावर्षी देवळा पूर्व भागातील सर्व कांदा चाळी रिकाम्या आहेत. मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला होता, त्यामुळे जेमतेम पावसाळी कांद्याचे उत्पादन झाले होते. परंतु पाण्याअभावी मात्र उन्हाळी कांद्याचे उत्पादन अजिबात झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून, बळीराजा कमालीचा आर्थिक कोंडीत सापडला आहे.

या भागाचे तिन्ही हंगामातील प्रमुख पीक कांदा आहे. या वर्षी दुष्काळाची भीषणता एवढी भयानक आहे की जनावरांना चारा आणि पाणी पुरविणेसुद्धा अवघड झाले आहे. चारा आणि पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे.
दरवर्षी या दिवसांत कांदा चाळी भरलेल्या दिसत. मात्र या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने चाळी रिकाम्या आहेत. तसा देवळा पूर्व भाग नेहमीचाच कमी पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो; परंतु या वर्षी तर दुष्कळाची भीषणता भयानक रूप आहे.
त्याचा परिणाम लग्न सराईवरदेखील झाला आहे. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी या वर्षी उपवर मुलामुलींचे लग्न थांबविले आहेत.