शिवरायांच्या प्रशासन कौशल्यावर धडा

By admin | Published: February 20, 2016 03:09 AM2016-02-20T03:09:40+5:302016-02-20T03:09:40+5:30

छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते. त्यांच्या याच क्षमतेची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात

Lessons on the administration of Shivrajaya's administration | शिवरायांच्या प्रशासन कौशल्यावर धडा

शिवरायांच्या प्रशासन कौशल्यावर धडा

Next

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते. त्यांच्या याच क्षमतेची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात आठ पानी धड्याचा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात शिवछत्रपतींच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे होते, त्यांचा पराक्रम आणि युद्धकौशल्य चौथीच्या पुस्तकात शिकविले जात आहे. या पराक्रमाबरोबरच शिवरायांच्या काळात जलसंधारण, जलसंवर्धन, पर्यावरण, शब्दकोष आणि शिवकालीन तलावांची विशेष व्यवस्था होती. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रमही त्यांच्या काळात राबविला गेला. त्याचबरोबर दुष्काळ निवारण्याची यंत्रणाही त्यांच्या काळात होती. शौर्याबरोबरच शिवाजी महाराज हे कुशल प्रशासकही (मॅनेजमेंट गुरू) होते, हा इतिहाससुद्धा शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या उद्दिष्टाने पुढील शैक्षणिक वर्षापासून पुस्तकात तो धडा समाविष्ट करण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले.सरकारला शिवाजी महाराजांचा विसर : नवाब मलिक
निवडणुकीत ‘शिवछत्रपती का आशीर्वाद; चलो चले मोदी के साथ’ अशी घोषणा देत सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारला शिवजयंतीच्या दिवशी मात्र छत्रपतींचा विसर पडला आहे. शुक्रवारी एकाही वृत्तपत्रातून शिवरायांच्या जयंतीची जाहिरात करण्यात आली नाही. ‘मेक इन इंडिया’साठी कोट्यवधींची उधळण करणाऱ्या सरकारकडे शिवजयंतीसाठी पैसा नसणे ही दुर्दैवाची बाब असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
जाहिरात न देणारे फडणवीस सरकार शिवस्मारकाबाबतही वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. मागील वर्षी शिवजयंतीला शिवस्मारकाचे भूमिपूजन करणार असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्याप शिवस्मारकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. निवडणूक काळात उठता-बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या भाजपा सरकारमधील नेत्यांना निवडणुका संपल्यानंतर शिवाजी महाराजांचा विसर पडला असल्याची टीका मलिक यांनी केली आहे.

Web Title: Lessons on the administration of Shivrajaya's administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.