तेल-अविवमध्ये ‘मराठी’चे धडे
By admin | Published: July 5, 2016 01:23 AM2016-07-05T01:23:09+5:302016-07-05T01:23:09+5:30
मुंबई विद्यापीठाने इस्रायलमधील तेल अविव विद्यापीठात मराठीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. सोमवारपासून हा वर्ग सुरू झाला असून, त्याला इस्रायलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त
मुंबई : मुंबई विद्यापीठाने इस्रायलमधील तेल अविव विद्यापीठात मराठीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. सोमवारपासून हा वर्ग सुरू झाला असून, त्याला इस्रायलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक विजय तापस, प्राध्यापक सोनाली गुजर आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या कादंबरी भंडारे यांनी सोमवारपासून इस्रायलमधील तेल-अविव विद्यापीठात मराठीचा वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या वर्गाला मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्य दूत डेव्हिड अकोव, इस्रायलमधील भारतीय दूतावासातील उप-राजदूत डॉ. अंजू कुमार आणि तेल-अविव विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्राध्यापक रानान रैन उपस्थित होते. (प्रतिनिधी)