डान्स बार्सना परवाने द्या - सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला तंबी
By admin | Published: November 26, 2015 01:03 PM2015-11-26T13:03:23+5:302015-11-26T13:03:23+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अमलबजावणी न केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांमध्ये राज्य सरकारने डान्स बार्सना परवाने देण्याची सुरुवात करावी
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अमलबजावणी न केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांमध्ये राज्य सरकारने डान्स बार्सना परवाने देण्याची सुरुवात करावी असा आदेश दिला आहे. यामुळे आता डान्स बारचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सुप्रीम कोर्टाने डामन्स बार बंदी उठवल्यानंतरही राज्य सरकारने आपली भूमिका डान्स बार बंदीचीच असल्याचे जाहीर केले होते. यातून काय मार्ग काढता येईल यावरही खल केला जात होता. परंतु, हॉटेलमालक अमलबजावणी होत नसल्याबद्दल पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले आणि कोर्टाने राज्याला खडसावले आहे.
डान्स बार्समध्ये अश्लील गोष्टी होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि दोन आठवड्यात हॉटेलांना डान्स बार्सचे परवाने देण्यास सुरुवात करावी असा आदेश सुप्रीम कोर्टाने गुरुवारी दिला आहे.