हॉटेल्स २४ तास खुली ठेवू द्या!
By admin | Published: July 3, 2016 07:14 PM2016-07-03T19:14:08+5:302016-07-03T19:14:08+5:30
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या ह्यमॉडेल शॉप्स अॅन्ड एस्टॅब्लिशमेंट्सह्ण विधेयकाची अंमलबजावणी राज्यांतही व्हावी, म्हणून हॉटेल व्यवसायिकांच्या संघटनेने चार राज्यांच्या सरकारला निवेदन दिले आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या ह्यमॉडेल शॉप्स अॅन्ड एस्टॅब्लिशमेंट्सह्ण विधेयकाची अंमलबजावणी राज्यांतही व्हावी, म्हणून हॉटेल व्यवसायिकांच्या संघटनेने चार राज्यांच्या सरकारला निवेदन दिले आहे. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश या चार राज्यांतील सरकारला दिलेल्या निवेदनात हॉटेल व रेस्टॉरन्ट २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी संघटनेने मागितली आहे.
यासंदर्भात हॉटेल अॅन्ड रेस्टॉरन्ट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया) या संघटनेचे अध्यक्ष भरत मलकानी म्हणाले की, याआधीच संघटनेने मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरन्ट २४ तास खुली ठेवण्याची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकानंतर ही मागणी प्रत्यक्षात येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे व्यवसाय आणि नाईट लाईफ यांची शहरातील
समीकरणे बदलणार आहेत. कारण यामुळे राज्याच्या महसूलात वाढ होणार असून रोजगाराच्या संधीही वाढतील. रात्रीच्या वेळी रस्त्यावर गर्दी असल्यास महिलांच्या सुरक्षेत आपोआपच वाढ होईल. तरी केंद्राच्या निर्णयाचे स्वागत करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे, की त्यांनीही यामधील सकारात्मक बाजूंचा विचार करून २४ तास हॉटेल व रेस्टॉरन्ट सुरू
ठेवण्यास मान्यता द्यावी.
संघटनेचे माजी अध्यक्ष कमलेश बरोट म्हणाले, अॅक्टीव्ह नाईट लाइफचा थेट फायदा पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायाला होतो. ज्याठिकाणी रात्रीसदेखील सर्व आस्थापने चालू असतात, अशा ठिकाणी व्यवसायिक पर्यटक एक किंवा दोन रात्र जास्तीचा मुक्काम करतात. खासकरून युरोप आणि अमेरिकेमधील पर्यटकांमध्ये दिवसभराच्या कामानंतर थकवा घालवण्यासाठी रात्री पार्टी करण्याची संस्कृती आढळून येते. पर्यटकांनी महाराष्ट्रामध्ये एक रात्र अधिक मुक्काम केल्यास ६०३ कोटींचा अधिक महसूल सरकारला प्राप्त होऊ शकतो.