मला अटक करू द्या, कोट्यवधी लोक रस्त्यावर दिसतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 11:05 AM2024-02-29T11:05:48+5:302024-02-29T11:06:32+5:30

मराठा आमदार, खासदार फडफड करायला लागलेत. नेत्याच्या बाजूने बोलतायेत असं म्हणत जरांगेंनी विरोधात बोलणाऱ्या नेत्यांवर टीका केली. 

Let me arrest, millions of people will appear on the streets; Manoj Jarange Patil warning to the government | मला अटक करू द्या, कोट्यवधी लोक रस्त्यावर दिसतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

मला अटक करू द्या, कोट्यवधी लोक रस्त्यावर दिसतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

छत्रपती संभाजीनगर - Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis ( Marathi News ) मला अटक करू द्या, ज्या जेलमध्ये असेन, ज्या रस्त्याने जाईल तेव्हा कोट्यवधी लोक रस्त्यावर दिसतील. मी दोषी नाही. मी समाजासाठी लढतोय. उभं आयुष्य पणाला लावलंय. ५७ लाख नोंदींच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना आरक्षण मिळालं असेल. उर्वरित मराठा समाजासाठी आरक्षण मागतोय. कुठलीही यंत्रणा वापरा, काहीही झालं तरी मी हटत नाही. सत्ता असल्याने ते कधीही अटक करू शकतात. आम्हाला कायदे कळत नाही का...संचारबंदी कधी लावावी लागते हे कळते. रात्रीच्या कारवाया सुरू आहेत असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. 

पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी शेतकऱ्याचं पोरगं, ग्रामीण भागात राहिलोय. भाषा माझी तशीच आहे. फडणवीस आणि माझं शत्रुत्व नाही. मी कुणाला घाबरत नाही. जेलला टाका नाहीतर कुठेही टाका..माघारी परतल्यावर पुन्हा आरक्षणासाठी लढेन. संधी हातातून गेलेली नाही. सरकारच्या अंगात मोठेपण हवेत. सगेसोयरेची अंमलबजावणी करा हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. 

तसेच मराठा समाजाच्याविरोधात कुणी बोललं तर मी सहन करत नाही. कुणबी आणि मराठा एकच आहे. मी सर्वांवर टीका केली. मराठा आरक्षणाविरोधात जो कुणी जाईल त्याला सोडणार नाही. मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. आम्हाला आरक्षणाव्यतिरिक्त काय नको. समाज हा राज्याचा मालक आहे. सरकार मालक नाही. स्वत:च्या न्यायासाठी समाज लढतोय. तुम्ही सगेसोयरे अंमलबजावणी करा, मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. मी मागे हटणार नाही. चौकशीआधीच अहवाल तयार झालाय. मला कुठेही टाकले तरी मी घाबरणार नाही असं जरांगेंनी म्हटलं. 

दरम्यान, मी गद्दार नाही. पाठीत खंजीर खुपसत नाही. देवेंद्र फडणवीस माझे शत्रू नाहीत. सगेसोयरे याची अंमलबजावणी करावी. ते त्या पदावर नसते तर आम्ही त्यांना कशाला बोललो असतो? अख्ख्या राज्यातून मराठा समाजाची फसवणूक कुणी कुणी केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत. सामुहिक कट रचून आमची फसवणूक केली असे गुन्हे आम्ही सरकारवर दाखल करू असंही जरांगेंनी म्हटलं आहे. 

फडणवीस त्यांचा डाव १०० टक्के यशस्वी करतील

माझ्यात जीवात जीव आहे तोपण आरक्षणासाठी लढत राहणार आहे. फडणवीस त्यांचा डाव १०० टक्के यशस्वी करतील. त्यात ते माहीर आहेत. माझ्याविरोधात अहवाल तयार होत आलाय. मला गुंतवायचे सुरू आहे. मराठा आमदार, खासदार फडफड करायला लागलेत. नेत्याच्या बाजूने बोलतायेत असं म्हणत जरांगेंनी विरोधात बोलणाऱ्या नेत्यांवर टीका केली. 

Web Title: Let me arrest, millions of people will appear on the streets; Manoj Jarange Patil warning to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.