एकात्मता जोपासण्याचा संकल्प करु या- सदाभाऊ खोत
By admin | Published: January 26, 2017 03:55 PM2017-01-26T15:55:09+5:302017-01-26T15:55:09+5:30
एकात्मता हीच देशाची खरी शक्ती असून या शक्तीची जोपासना करण्याचा संकल्प आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण साऱ्यांनी करु या
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २६ - एकात्मता हीच देशाची खरी शक्ती असून या शक्तीची जोपासना करण्याचा संकल्प आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण साऱ्यांनी करु या, असे आवाहन राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे केले. जळगाव येथे प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर ना. खोत यांनी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खोत म्हणाले की, येणारा काळ हा तरुणांचा आहे. तरुणाईने देशाला गरीबी, मागासलेपणाच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी सज्ज व्हावे. त्यांच्या कौशल्य आणि बुद्धिमत्तेला आज अनेक नवनवी क्षितीजे खुणावत आहेत. त्यांच्या आकांक्षांना आणि स्वप्नांना मर्यादांची गवसणी घालू नका. त्यांच्या आकांक्षापूर्तीसाठी तरुण जीवापाड मेहनत घेतील आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जातील, असा आशावाद खोत यांनी व्यक्त केला.
शानदार संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम
या कार्यक्रमात ना. सदाभाऊ खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. तसेच त्यांनी उघड्या जीप मधून परेडची पाहणी केली. परेडचे नेतृत्व प्रशिक्षणार्थी भापोसे अधिकारी मनिष कलानिया यांनी केले .