महिलांना खासगी स्वच्छतागृहे वापरू द्या

By admin | Published: March 10, 2016 04:03 AM2016-03-10T04:03:22+5:302016-03-10T04:03:22+5:30

महिलांना आवश्यकता भासेल तेव्हा खासगी स्वच्छतागृहांच्या वापराची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीतील चर्चेवेळी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी बुधवारी केली

Let the women use private toilets | महिलांना खासगी स्वच्छतागृहे वापरू द्या

महिलांना खासगी स्वच्छतागृहे वापरू द्या

Next

राइट टू पी : पालिकेच्या स्थायी सभेत मागणी
मुंबई : महिलांना आवश्यकता भासेल तेव्हा खासगी स्वच्छतागृहांच्या वापराची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीतील चर्चेवेळी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी बुधवारी केली. हॉटेल, रुग्णालय, शाळा, खासगी कार्यालयांमधील शौचलायांचा वापर मर्यादीत न ठेवता सर्वच महिलांना करु देण्यात यावा, असेही त्यांनी मागणीत म्हटले आहे.
महिलांकरिता शौचालय बांधण्यास वर्षभरात कोणत्याच हालचाली पालिका प्रशासनाने न केल्यामुळे अर्थसंकल्पातील तरतूद वाया गेल्याची धक्कादायक बाब बुधवारी उघडकीस आली़ त्यामुळे हा विषय पुढे आला. खासगी शौचलायांत प्रवेश नाकारल्यास महिलांनी पालिकेकडे तक्रार करावी. कारवाई करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभी करावी, असेही तृष्णा विश्वासराव यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Let the women use private toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.