'सनफिस्ट मारी लाइट' आणि 'लोकमत'सह साजरे करा 'लाइट' क्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 04:02 PM2024-05-10T16:02:35+5:302024-05-10T16:04:09+5:30

सनफिस्ट मारी लाइटचे उद्दिष्ट प्रत्येक घरात स्ट्राँग जोडी तयार करण्यात मदत करणे आहे. असे जोडपे प्रत्येक घरात तेव्हाच तयार होऊ शकते, जेव्हा हे जोडपे एक कप चहा आणि सनफिस्ट मारी लाइट बिस्किटांसह वेळ घालवतील.

let's celebrate Light moments with Sunfeast Marie Light and Lokmat | 'सनफिस्ट मारी लाइट' आणि 'लोकमत'सह साजरे करा 'लाइट' क्षण

'सनफिस्ट मारी लाइट' आणि 'लोकमत'सह साजरे करा 'लाइट' क्षण

महाराष्ट्राच्या संस्कृतीत परंपरा आणि आधुनिकता यांचा मिलाफ दिसनू येतो. येथील लोकांच्या हृदयात नात्यांसाठी एक खास स्थान आहे. हीच संस्कृती लक्षात घेऊन आणि जोडप्यांमधील बंध वाढवण्यासाठी सनफिस्ट मारी लाइट आणि लोकमत मीडियाने एकत्र येऊन "लाइट क्षण बनवतात एक स्ट्रॉंग जोडी" हा विशेष उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात जोडप्यांमधील लाइट क्षण साजरे केले जातील, जेणेकरून त्यांच्यातील नाते आणखी घट्ट होईल. रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा, औरंगाबाद आणि पुणे यांसारख्या महाराष्ट्रातील अनेक शहरांतील जोडप्यांमधील उत्तम समन्वयाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम या राज्याच्या संस्कृतीशी सुसंगत आहे. चहा आणि सनफिस्ट मारी लाइट, या दोन्ही गोष्टी कोणत्याही नात्यातील बंध मजबतू करण्यासाठी आवश्यक आहेत.

हे आहे स्ट्राँग जोडीचे रहस्य

सनफिस्ट मारी लाइटचे उद्दिष्ट प्रत्येक घरात स्ट्राँग जोडी तयार करण्यात मदत करणे आहे. असे जोडपे प्रत्येक घरात तेव्हाच तयार होऊ शकते, जेव्हा हे जोडपे एक कप चहा आणि सनफिस्ट मारी लाइट बिस्किटांसह वेळ घालवतील. अनेकदा जेव्हा जोडपे चहा पिताना एकत्र असतात, तेव्हा ते विचारविनिमय करतात, एकमेकांशी गोष्टी शेअर करतात आणि हे क्षण त्यांना रोजची कामे करण्यासाठी नव्याने ताजेपणा देतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेने प्रेरित होऊन, हा उपक्रम अशा खऱ्या जीवनातील जोडप्यांना जगासमोर आणण्यासाठी काम करेल; ज्यांच्या नात्यात घट्ट बंध आहे आणि ज्यांना या बंधातून बळही मिळते. 

व्यग्र वेळापत्रक असूनही, अजूनही अनेक अशी जोडपी आहेत जी एकमेकांसोबत छोटे छोटे आणि साधे दिसणारे पण जीवनातील अर्थपूर्ण क्षण जगतात. आजच्या जगात मन विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. तसेच माणसाकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यामुळे नातेसंबंध मजबूत ठेवणे आज पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक झाले आहे. त्यामुळेच हा उपक्रम विशेष ठरतो. या उपक्रमात, जोडप्यांमधील त्या लाइट क्षणांवर लक्ष केंद्रीत केले जाईल, जे इतरांना प्रेरणा देऊ शकतात. या उपक्रमात जोडप्यांना एक व्यासपीठही दिले जाणार आहे, ज्याद्वारे त्यांचे नाते अधिक घट्ट होऊ शकते. 

सनफिस्ट मारी लाइट देतो लाइट क्षणांना प्रोत्साहन

"लाइट क्षण बनवतात एक स्ट्राँग जोडी" या उपक्रमाचा उद्देश सनफिस्ट मारी लाइट बिस्किटचा आनंद कसा घ्यावा याबद्दल जागरुकता पसरवणे हा देखील आहे. या बिस्किटाची चव उत्कृष्ट असून त्यात लोह आणि जीवसत्त्वे असतात. ज्याप्रमाणे आपण एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतो, त्याप्रमाणे प्रत्येक बाइटचा आनंद घेता येईल, अशा पद्धतीने हे बिस्किट तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जोडपी जेव्हा त्यांच्यातील बंध दृढ करण्यासाठी आणि लाइट क्षणांचा आनंद घेण्यासाठी प्रवासात असतात, तेव्हा या प्रवासात सनफिस्ट मारी लाइट बिस्किट त्यांच्या अप्रतिम साथीदाराची भूमिका बजावत आहे. सनफिस्ट मारी लाइटने महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपे प्रिया बापट आणि उमेश कामत यांनाही या उपक्रमाशी जोडले आहे. त्यांना जोडल्याने सनफिस्ट मारी लाइट बिस्किट आणि चहाच्या कपसोबत घालवलेले लाइट क्षण साजरे करण्यात आणि कॅप्चर करण्यात मदत होईल. हे बिस्किट त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे आणि सोबतच त्यांच्या नात्यातील गोडवा देखील वाढवत आहे. 
 

Web Title: let's celebrate Light moments with Sunfeast Marie Light and Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.