चक्का जाम आंदोलन करु

By admin | Published: October 8, 2015 02:53 AM2015-10-08T02:53:20+5:302015-10-08T02:53:20+5:30

एसटी महामंडळाचे तोट्यातील मार्ग हे खासगी वाहतूकादारांना कंत्राटी पध्दतीने देण्याचा विचार सुरु आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून दोन ते तीन महिन्यात सार्वजनिक उपक्रम

Let's face movement | चक्का जाम आंदोलन करु

चक्का जाम आंदोलन करु

Next

मुंबई : एसटी महामंडळाचे तोट्यातील मार्ग हे खासगी वाहतूकादारांना कंत्राटी पध्दतीने देण्याचा विचार सुरु आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून दोन ते तीन महिन्यात सार्वजनिक उपक्रम समितीला अहवाल सादर केला जाणार आहे. त्याला एसटीची मान्यताप्राप्त संघटना असलेल्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून विरोध करण्यात आला आहे. संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सांगितले की, या निर्णयास ठाम विरोध असून चक्का जामसारखे आंदोलन केले जाईल. कारण अवैध खासगी प्रवासी वाहतूकीवर बंदी आणण्याचा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ८ जानेवारी २00२ रोजी दिलेल्या निर्णयाची शासकीय यंत्रणेकडून संक्षमपणे अंमलबजावणी होत
नसल्यामुळे एसटी महामंडळाचे मार्ग तोट्यास जाण्यास एक मुख्य कारण आहे.
तसेच तोट्याचे मार्ग खाजगी वाहतूकदारांना दिल्यास खाजगी वाहतूकदार तोट्याच्या मार्गावर न जाता गैरवापर करुन उत्पन्न मिळणाऱ्या मार्गावर जातील. कारण खासगी वाहतूकदार हे प्रवासी सेवेसाठी काम न करता उत्पन्न मिळवण्यासाठीच काम करत आहे. अशापध्दतीने खासगी वाहतूकदारांना मार्ग उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु करणे म्हणजे एसटीचे अस्तित्व धोक्यात आणण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Let's face movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.