"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधानांकडे जाऊ या!"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 11:40 AM2023-02-06T11:40:38+5:302023-02-06T11:42:10+5:30

म.सा.प.च्या कार्याध्यक्षांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Let's go to the Prime Minister to give the status of classical language to Marathi The demand of the working president of M.S.P. to the Deputy Chief Minister | "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधानांकडे जाऊ या!"

"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधानांकडे जाऊ या!"

googlenewsNext

वर्धा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी साहित्य संस्थांच्या प्रतिनिधीचे व साहित्यिकांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी नेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. वर्धा येथे ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशीच्या सत्राचा प्रारंभ करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी वर्ध्यात आले होते. यावेळी प्रा. मिलिंद जोशी यांनी त्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन त्यांना सादर केले.

 मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने लोकचळवळ उभी केली. पंतप्रधान कार्यालयाला एक लाख पत्रे पाठविली. साहित्यिकांच्या बैठका, त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन, राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी, अशा अनेक गोष्टी केल्या. एवढेच नव्हे तर राजधानी दिल्लीतही आवाज उठविला. आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता होऊनही अद्याप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. तो मिळणे ही मराठी माणसांसाठी अभिमानास्पद गोष्ट असणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी साहित्य संस्थांच्या प्रतिनिधीचे व साहित्यिकांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीसाठी घेऊन जावे, अशी विनंती जोशी यांनी फडणवीस यांच्याकडे केली.

Web Title: Let's go to the Prime Minister to give the status of classical language to Marathi The demand of the working president of M.S.P. to the Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.