लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक न्यायाचा वसा अखंड चालू ठेऊ - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 01:57 PM2022-05-06T13:57:23+5:302022-05-06T14:49:24+5:30

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी मुंबईतील चित्रकूट निवासस्थानी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच 100 सेकंद स्तब्ध उभे राहून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

Let's keep the fat of social justice of Lok Raja Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj intact - Dhananjay Munde | लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक न्यायाचा वसा अखंड चालू ठेऊ - धनंजय मुंडे

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक न्यायाचा वसा अखंड चालू ठेऊ - धनंजय मुंडे

googlenewsNext

मुंबई : कृती व प्रगतीचा संगम असलेले लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाच्या विचारांनी महाराष्ट्र समृद्ध केला. त्यांच्याच विचारांचा वसा अखंड चालू ठेऊ असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

राजर्षी शाहू महाराजांचे हे स्मृती शताब्दी वर्ष असून सकाळी 10 वाजता राज्यात 100 सेकंद जिथे आहेत तिथे स्तब्ध उभे राहून एकाच वेळी लोकराजास अनोखे अभिवादन करण्यात आले. 

धनंजय मुंडे यांनी मुंबईतील चित्रकूट निवासस्थानी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच 100 सेकंद स्तब्ध उभे राहून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

धनंजय मुंडे यांनी  शाहू महाराजांचे 100 वे स्मृतीवर्ष कृतज्ञता पर्व म्हणून साजरे करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 5 कोटी रुपयांचा निधी देखील कोल्हापूर जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत.

Web Title: Let's keep the fat of social justice of Lok Raja Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj intact - Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.