कोकणला समृद्धीचे प्रवेशद्वार करू

By admin | Published: October 14, 2014 01:24 AM2014-10-14T01:24:22+5:302014-10-14T01:24:22+5:30

मत्स्यनिर्यात, पर्यावरण पर्यटन, किल्लेपर्यटन यासारख्या अनेक माध्यमांतून कोकणचा विकास करणो शक्य आहे. इथला समुद्र महाराष्ट्रच नाहीतर देशाच्या समृद्धीचे प्रवेशद्वार होऊ शकतो,

Let's make Konkan prosperous | कोकणला समृद्धीचे प्रवेशद्वार करू

कोकणला समृद्धीचे प्रवेशद्वार करू

Next
रत्नागिरी : मत्स्यनिर्यात, पर्यावरण पर्यटन, किल्लेपर्यटन यासारख्या अनेक माध्यमांतून कोकणचा विकास करणो शक्य आहे. इथला समुद्र महाराष्ट्रच नाहीतर देशाच्या समृद्धीचे प्रवेशद्वार होऊ शकतो,  असे सांगतानाच महाराष्ट्राचा डंका सर्वत्र पिटला जावा, यासाठी आता महाराष्ट्रातही पूर्ण बहुमताचे सरकार निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. 
रत्नागिरीतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होत़े 
मोदी म्हणाले, विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या या भागातील व्यापार सुरक्षित राहावा, यासाठी शिवाजी महाराजांनी समुद्रात किल्ले बांधले आहेत. कोकणाकडे जर लक्ष दिले गेले असते तर कोकण कुठल्या कुठे पोहोचला असता़लोकमान्य टिळकांची ही जन्मभूमी आहे. त्यांनी आपल्याला एक मंत्र दिला होता, ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे.’ आता त्यात बदल करायला हवाय. ‘सुराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,’ असे म्हणायला हवे. कारण आता भारत स्वतंत्र असल्याचे मोदी 
म्हणाल़े   (वार्ताहर)
 
विदर्भाबाबत शरद पवार भांडणो लावताहेत!
सांगली : वेगळ्या विदर्भाबाबत सार्वमत घेण्याची भाषा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नव्याने भांडण निर्माण करीत आहेत, अशी टीका भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांनी सांगलीत केली. प्रशासकीय कामाच्या दृष्टीने छोटी राज्ये असावीत, अशी भूमिका भाजपाने 25 वर्षापूर्वीच घेतली होती. आजही ती भूमिका कायम आहे, असे सूचित करीत वेगळ्या विदर्भाच्या मुद्दय़ावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 

Web Title: Let's make Konkan prosperous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.