चला, स्वावलंबी शहरे बनवू या!
By admin | Published: September 7, 2014 01:34 AM2014-09-07T01:34:48+5:302014-09-07T01:34:48+5:30
आपल्या देशात मोठी शहरे, मध्यम शहरे आणि छोटी शहरे अशी तीन प्रकारची शहरे आहेत. आणि ग्रामीण भागातून शहराकडे येण्याचा रोख आपण काही थांबवू शकत नाही.
Next
- चंद्रशेखर प्रभू
आपल्या देशात मोठी शहरे, मध्यम शहरे आणि छोटी शहरे अशी तीन प्रकारची शहरे आहेत. आणि ग्रामीण भागातून शहराकडे येण्याचा रोख आपण काही थांबवू शकत नाही. सबब, शहरांची वाढ ही अटळ आहे. शहरांमध्ये लोकसंख्या अधिक झाल्यामुळे पायाभूत सुविधा लोकसंख्येच्या प्रमाणात वाढायला हव्यात. अनेक कारणास्तव अशा सुविधा वाढविल्या जात नाहीत आणि म्हणून ही शहरे राहण्यायोग्य राहत नाहीत (अनलिव्हेबल)..
मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू या शहरांचा यामध्ये समावेश होत असून, या शहरांमध्ये आता मोकळ्या जागाही शिल्लक राहिलेल्या नाहीत. या शहरांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, शहरीकरणामुळे मूलभूत सुविधांचे प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची योग्यपणो सोडवणूक करता येत नाही. सध्या असलेली शहरे परवडण्यायोग्य नसतील तर नवीन विचार करणो आवश्यक असते. यातूनच स्मार्ट सिटींचा पर्याय पुढे आला असून, 1क् वर्षापूर्वीच मी स्वत: स्मार्ट सिटींची संकल्पना नियोजन आयोगाकडे व केंद्र-राज्य सरकारांच्या विविध पातळीवर मांडली होती.
स्मार्ट सिटीचा अर्थ लोक वेगवेगळ्या प्रकारे लावू शकतात. काही जणांचे म्हणणो असे आहे, की सध्या असलेल्या शहरांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात म्हणजे ही शहरे स्मार्ट सिटी होतील. या शहरांचे रूपांतर स्मार्ट सिटीत करता येईल. इतरांचे असे म्हणणो आहे, की प्रत्येक शहराला लागून एक पूरक शहर, जोड शहर असते. मुंबई महानगर प्रदेशाचा विचार करता मुंबई शहराला नवी मुंबईसारखे शहर पूरक आहे. तसेच अहमदाबादला गांधीनगर, दिल्लीला गुडगाव, नोएडा व इत्यादी. नाशिकला नवे नासिक. औरंगाबादला नवे औरंगाबाद वेगैरे पूरक शहरे आहेत. अशा शहरांच्या सुविधा अद्ययावत केल्या, तर या पूरक शहरांना स्मार्ट म्हणता येईल.
किंबहुना सध्या असलेल्या शहरांमध्येच नवीन सुविधा पुरवून त्यांना स्मार्ट करणो याच्यापेक्षा मोकळ्या जमिनीवर नवीन शहरे वसवणो हाच मार्ग अधिक सोयीस्कर वाटतो. शहराला स्मार्ट करताना अनेक अडचणी येतात. अशा शहरांत लोकांचे वास्तव्य असते. बांधकामे उभारलेली असतात. त्यातच पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लोकांना खूप त्रस सोसावा लागतो. उदाहरणच घ्यावयाचे झाले तर मुंबईत वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर असा मेट्रो मार्ग उभारताना तेथील रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आहे ते शहर स्मार्ट सिटीमध्ये रूपांतरित करताना अडथळ्यांच्या शर्यतीला पार करावे लागते. इतक्या अडथळ्यांची शर्यत जिंकली तरी ती शहरे स्मार्ट होतील, असे नव्हे. नव्या स्मार्ट सिटी उभारताना अशा अडचणी येत नाहीत. सर्व नागरिकांच्या सर्व गरजा भागवू शकतील, अशी शहरे म्हणजे स्मार्ट सिटी होय. 2क् किंवा 1क्क् वर्षानंतरही वास्तव्य करणा:या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करतील, अशी क्षमता असलेल्या शहरांना स्मार्ट सिटी म्हणतात. मात्र स्मार्ट सिटी उभारताना यासंबंधीच्या योजनाही तितक्याच काळजीपूर्वक करणो गरजेचे आहे.
नव्या स्मार्ट सिटी उभारताना त्या जुन्या शहरांपासून नजीकच्या अंतरावर असणो गरजेचे आहे किंवा थोडसे दूर असले तरी सध्याच्या शहरापासून स्मार्ट सिटीर्पयत असलेली वाहतूक व्यवस्था इतकी जलद असली पाहिजे, की एक तासामध्ये स्मार्ट सिटीत पोहोचता यायला हवे. जुने शहर व नवे शहर यातील अंतर कमी असले, की ही दोन्ही शहरे एकमेकांना जोडणो सुलभ होते. पण खूप जवळ शहरे आले की एकाची शीव कुठे संपते आणि दुसरे शहर कुठे सुरू होते याचा पत्ता लागत नाही. उदाहरणार्थ मुंबई ते दहिसर व मीरा रोड यांच्यामध्ये जर खाडी नसती तर ते एकाच शहराचा भाग समजले जाऊ शकले असते. तसेच मुलुंड आणि ठाण्यामध्ये चेकनाका सोडल्यास कुठेच वेगळे शहर असल्याची संकल्पना दिसत नाही. त्यामुळे जर स्मार्ट सिटी मोठय़ा शहराच्या फारच जवळ असली तर काही वर्षानी ती मोठय़ा शहराचा भागच होऊ शकते. असे होणो स्मार्ट सिटीच्या संकल्पनेला पूरक नाही. स्मार्ट सिटी म्हणजे सॅटेलाइट टाऊनशिप नव्हे. स्मार्ट सिटी म्हणजे एक स्वावलंबी शहर होय. स्वावलंबी शहर ही एक संकल्पना असून, ही शहरे इतर कोणत्याही शहरावर अवलंबून राहत नाहीत.
(लेखक शहर नियोजन तज्ज्ञ आहेत.)
स्मार्ट सिटीचा गाभा म्हणजेच रोजगारनिर्मिती. एकदा का रोजगार मिळायला लागला की शहराला बळकटी येते. मात्र अशा शहरांचा विचार करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अशा शहरांत सुरुवातीला लाख लोकसंख्या मावली आणि नंतर ती वाढली तरी तिचा त्या शहरावर बोजा पडणार नाही.
अशा शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रणाली बळकट असेल तर शहरांना वेग येईल. इंटरनेट व वायफाय सुविधा सर्वत्र असतील तर ही शहरे टेक्नोसॅव्ही होतील. शाळा, महाविद्यालये असली तरी इंटरनेटसह वायफाय असल्याने घरबसल्या शिक्षण घेता येईल, अशी सुविधा तेथे निर्माण होईल. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पहिलीपासून पीएचडीर्पयतचे आंतरराष्ट्रीय शिक्षण दर्जाचे मिळेल आणि यातून शिक्षणाचा दर्जा वाढेल.