‘आता निवडणुकीनंतर भेटू’...सोशल मीडियावरील आचारसंहितेचा राजकीय नेत्यांनी घेतला धसका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 07:43 PM2019-03-13T19:43:00+5:302019-03-13T19:53:30+5:30
राजकीय घडामोडीमध्ये सोशल मीडिया आघाडीवर असून, यामध्ये फेसबुक, व्हॉटस्अप , ट्विटर, यू ट्यूब आणि ब्लॉग या पाच सोशलमीडियावर पंचरंगी लढत सुरु झाल्या आहेत.
पुणे: लोकसभा निवडणुक २०१९ साठी संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली आहे. यामध्ये निवडणुक आयोगाने प्रथमच आचारसंहितेसाठी कडक निर्बंध घातले आहेत. त्यातही सोशल मीडियावर अधिक लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळेच महापालिकेली आणि शहरातील काही पदाधिकारी आता निवडणुकीनंतर पुन्हा भेटू असे सांगत कार्यकर्त्यांच्या अनेक गुप्रमधून एक्झिट घेतली आहे.
सध्या संपूर्ण राज्यासह पुणे शहरामध्ये देखील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. पक्षाच्या नेत्यांच्या बैठका, चर्चा, पक्षांतर आदी राजकीय घडामोडीने वेग घेतला आहे. परंतु या सर्व राजकीय घडामोडीमध्ये सोशल मीडिया आघाडीवर असून, यामध्ये फेसबुक, व्हॉटस्अप , ट्विटर, यू ट्यूब आणि ब्लॉग या पाच सोशलमीडियावर पंचरंगी लढत सुरु झाल्या आहेत. यामध्ये एखाद्या नेत्याच्या वक्तव्य एडिट करून ट्रोलिंग करण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. त्यात निवडणुक आयोगाची आचारसंहित लागू झाल्याने व सोशलमीडियावर अधिक लक्ष देणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. या सोशलमीडियावरील राजकारणामुळे भविष्यात अडचण निर्माण होऊ शकते. यामुळे महापालिकेतील काही वरिष्ठ पदाधिकारी आणि विविध पक्षांचे स्थानिक नेते व काही नगरसेवकांनी गेल्या दोन दिवसांत अनेक व्हॉट्स ग्रुपअॅप मधून एक्झिट घेतले आहे. व्हॉटस्अप ग्रुपमधून एक्झिट होताना कार्यकर्ते देखील नाराज होऊन नये म्हणून निवडणुकीनंतर पुन्हा भेटू असे सांगितले आहे.
-------------------------
आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून बाहेर पडलो
निवडणुकीच्या काळामध्ये सर्वच सोशलमीडिया व त्याचा वापर करणारे कार्यकर्ते प्रचंड सक्रिय होतात. यामध्ये अनेक वेळा आपली मते मांडल्यानंतर मतभेद होतात. तर काही वेळा एखाद्या वाक्यावर वादा देखील निर्माण होतात. त्यात आता आराचसंहिता लागू झाली आहे. एखाद्या पदावार असलेल्या व्यक्तींची सोशलमीडियावर पोस्ट देखील प्रचाराचा भाग समजला जातो. यामुळे आचारसंहितेचा भंग होण्याची शक्यता असते. यामुळे निवडणुका जाहिर झाल्यानंतर सर्व राजकीय व्हॉट्स अप मधून मी बाहेर पडलो आहे. परंतु निवडणूक संपल्यानंतर पुन्हा संक्रीय होऊ.
- डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर