चला, गिधाड वाचवू या!

By Admin | Published: January 2, 2015 01:54 AM2015-01-02T01:54:18+5:302015-01-02T01:54:18+5:30

गिधाडांची घटत जाणारी संख्या वाढावी, गिधाडांचे संवर्धन व्हावे आणि त्यांना संरक्षण मिळावे म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या वतीने कोकणात ‘जटायू महोत्सव’ हाती घेण्यात आला

Let's save the vulture! | चला, गिधाड वाचवू या!

चला, गिधाड वाचवू या!

googlenewsNext

मुंबई : गिधाडांची घटत जाणारी संख्या वाढावी, गिधाडांचे संवर्धन व्हावे आणि त्यांना संरक्षण मिळावे म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या वतीने कोकणात ‘जटायू महोत्सव’ हाती घेण्यात आला असून, या अंतर्गत आयोजित स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विजेत्या गावांसाठी एकूण ५० हजार रुपयांची बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.
गिधाड संवर्धन स्पर्धेसाठी सह्याद्रीने दोन गट केले आहेत. पहिल्या गटात गिधाडांची घरटी असणारी गावे आणि दुसऱ्या गटात गिधाडांची घरटी नाहीत अशा गावांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेचा कालावधी १६ जानेवारी ते २५ मार्च असा आहे. या कालावधीत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावांना गिधाड संरक्षण, डायक्लोफेनॅकचा वापर गुरांच्या उपचारासाठी करू नये, गिधाडासंबंधी जनजागृती यांसारखी कामे संस्थेच्या मदतीने करणे अपेक्षित आहे. प्रत्येक कामासाठी स्पर्धकांना ठरावीक गुण देण्यात येतील.
सहभागी गावांना संस्थेतर्फे गिधाड संरक्षणाची कार्यशाळा, जनजागृतीसाठी प्रदर्शनी साहित्य, फलक अशा विविध गोष्टी मोफत दिल्या जातील. शिवाय तज्ज्ञांमार्फत सहभागी गावांच्या कामांची पाहणी केली जाईल; आणि अधिकाधिक गुण मिळविणाऱ्या गावांना विजयी घोषित केले जाईल. १५ जानेवारीपर्यंत या स्पर्धेसाठी नोंदणी करता येईल. इच्छुकांनी यासंदर्भात अधिक माहितीसाठी सह्याद्री निसर्ग मित्र, ११, युनायटेड पार्क, मार्कंडी, चिपळून, पिन : ४१५६०५ या पत्त्यावर संपर्क साधावा. अथवा २ंँ८ं१्रिूस्रल्ल@ॅें्र’.ूङ्मे या ईमेलवर संपर्क करता
येईल. (प्रतिनिधी)

च्सह्याद्री निसर्ग मित्र आणि सी.ई.पी.एफ. यांच्या संयुक्त विद्यमाने वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम घाटाच्या उत्तर विभागातील गिधाडांचे संवर्धन व संरक्षण प्रकल्प राबविण्यात येत आहे.

च्कोकण परिसरात केलेल्या सर्वेक्षणानुसार, श्रीवर्धन, चिरगाव, नाणेमाची आणि विहली येथे गिधाडांच्या वसाहती आढळून आल्या आहेत. या वसाहतींना स्थानिकांच्या मदतीने संरक्षण देण्याचे काम केले जात आहे.

सहभागी गावांना संस्थेतर्फे गिधाड संरक्षणाची कार्यशाळा, जनजागृतीसाठी प्रदर्शनी साहित्य, फलक अशा विविध गोष्टी मोफत दिल्या जातील.

च्गिधाडांची संख्या कमी होत असल्याने
ती वाढावी म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र काम करत आहे.
च्रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गिधाडांच्या संवर्धनासह संरक्षण आणि जनजागृतीसाठी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Web Title: Let's save the vulture!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.