सांगाल ते देऊ, पण आचारसंहिता संपल्यानंतर - मुख्यमंत्री
By Admin | Published: February 3, 2017 08:35 PM2017-02-03T20:35:47+5:302017-02-03T20:35:47+5:30
राज्य सरकार लेखक, पत्रकार यांच्या पाठीशी उभी राहणार, साहित्य क्षेत्रासाठी या महापालिकेत जे लागेल ते सगळं देणार
> ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 3 - राज्य सरकार लेखक, पत्रकार यांच्या पाठीशी उभी राहणार, साहित्य क्षेत्रासाठी या महापालिकेत जे लागेल ते सगळं देणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले. निवडणूक आचार संहितेचे सावट आज झालेल्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावरही दिसून आले. निवडणूक आयोगाने संमेलनास उपस्थित राहण्यासाठी दिलेल्या सशर्त परवानगीमुळे संमेलनाच्या व्यासपीठावरून करण्यात आलेल्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी थेट घोषणा न करता सकारात्मक प्रतिसाद दिला.
मुख्यमंत्री म्हणाले, संमेलनात यायला मिळालं याचा आनंद आहे, इथं भाषा प्रभू आहेत, सारस्वत मेळाव्यात माझी नोंद होईल. आचारसंहिता असल्याने येता येणार कि नाही हे निश्चित नव्हते. पण निवडणूक आयुक्तांनी परवानगी दिली. त्यामुळे त्यांचे आभार मानतो."
"संस्कृतीचं संरक्षण मराठीने केलं पाहिजे, 12 कोटी पेक्षा जास्त जी भाषा बोलतात ती मराठी जगातील प्रमुख भाषा आहे. आपली भाषा अनुवादित करायला हवी, विष्णू जिनी मांडलेली व्यथा रास्त आहे. मराठी जगवली पाहिजे , ती प्रतिष्ठित झाली पाहिजे, मराठी शाळा जगवायच्या असतील तर मराठीला ज्ञान भाषेत रूपांतर करणार नाही तो पर्यत करू शकणार नाही." असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मराठी भाषा आणि मराठी माध्यमाच्या शाळांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेत. मराठीला ज्ञानभाषा करणारच असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.