देवनार डंपिंग ग्राऊंडवर तोडगा काढण्यासाठी सचिनचं महापालिका आयुक्तांना पत्र
By admin | Published: March 3, 2016 11:20 AM2016-03-03T11:20:20+5:302016-03-03T11:46:20+5:30
मास्टर ब्लास्टर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने देवनार डंपिंग ग्राऊंडप्रकरणी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र पाठवलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ३ - मास्टर ब्लास्टर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने देवनार डंपिंग ग्राऊंडप्रकरणी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र पाठवलं आहे. या पत्राद्वारे सचिनने देवनार डंपिंग ग्राऊंडवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची विनंती केली आहे.
सचिनने पत्रात देवनार डंपिंग ग्राऊंडजवळ राहणा-या लोकांना होणा-या समस्या मांडल्या आहेत. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं सचिनने म्हणलं आहे. सचिन तेंडुलकरने शिवाजी नगरमधील कॉलनीला भेट दिली होती त्यानंतरच त्याने ही परिस्थिती महापालिका आयुक्तांसमोर मांडण्याच ठरवलं होतं. येथे राहणा-या कुटुंबाना पाणी,आरोग्य, सांडपाण्याचा निचरा, बँक, शाळा कोणत्याच सुविधा मिळत नाही आहेत. अनेक मुलांना कच-याच्या ढिगा-यावर खेळताना पाहिलं जातं त्यामुळे या समस्या लवकरात लवकर सोडवण्याची विनंती सचिनने अजॉय मेहता यांच्याकडे केली आहे.
मुंबईतून दररोज 10 हजार मेट्रिक टन कचरा येतो, तो शहरातील तीन डम्पिंग ग्राऊण्ड्समध्ये टाकला जातो. अनेक नगरसेवकांनी महापालिका न्यायालयात कच-याच व्यवस्थापन करण्याची फक्त प्रतिज्ञापत्र सादर करतं मात्र प्रत्यक्षत्रा काहीच करत नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता स्वत: सचिन तेंडुलकरने विनंती केल्यानंतर तरी महापालिका या समस्येकडे गंभीरतेने लक्ष देईल अशी आशा आहे.