हेल्मेट नसल्यास पालकांना पत्र

By Admin | Published: June 30, 2014 11:55 PM2014-06-30T23:55:42+5:302014-06-30T23:55:42+5:30

हेल्मेट वापरासाठी आता पोलीस मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करणार असून, प्रामुख्याने तरुणांना हेल्मेट घालण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे.

Letter to the parent if not helmet | हेल्मेट नसल्यास पालकांना पत्र

हेल्मेट नसल्यास पालकांना पत्र

googlenewsNext
>पुणो : हेल्मेट वापरासाठी आता पोलीस मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करणार असून, प्रामुख्याने तरुणांना हेल्मेट घालण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. जे वाहनचालक हेल्मेट वापरणार नाहीत, त्यांचा डाटाबेस तयार करण्यात येणार आहे. त्या वाहनचालकांच्या पालकांना पत्रे पाठविण्यात येणार असल्याची 
माहिती पोलीस आयुक्त सतीश 
माथूर यांनी दिली. या वेळी माथूर बोलत होते.  
वाहतूक पोलीस आणि रोटरी क्लबच्या वतीने शहरातील 5क्क् रोटरॅक्ट सदस्यांना हेल्मेट वाटप करून हेल्मेट व रस्ता सुरक्षा कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला़ 
 माथूर म्हणाले,    की हेल्मेट जनजागृतीसाठी विमा कंपनीची मदत घेण्यात येणार आहे. दुचाकी वाहन विक्री करणा:या वितरकांना वाहन विक्री करतानाच हेल्मेट पुरविण्यासंबंधी सूचना देण्यात येतील़ जे वाहनचालक हेल्मेट वापरणार नाहीत़ त्यांचा डाटाबेस तयार करण्यात येणार आह़े तसेच, अशा वाहनचालकांच्या पालकांना पत्र अथवा ई -मेलद्वारे माहिती देण्यात येईल़ तसेच काही संस्थांनाही या उपक्रमामध्ये सहभागी करून हेल्मेट जनजागृती व रस्ता सुरक्षाविषयक जनजागृतीबाबत उपक्रम राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितल़े 
रोटरी क्लबचे प्रांतपाल डॉ़ दीपक शिकारपूर, भावी प्रांतपाल विवेक अराहना यांनी मार्गदर्शन केल़े या वेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे उपस्थित होत़े 
 
4शहरातील 5क् रोटरी क्लब व 28 रोटरॅक्ट क्लब यांच्या मदतीने पुणो शहरामध्ये वर्षभर हेल्मेट व रस्ता सुरक्षा कार्यक्रम राबविण्यात येणार आह़े या कार्यक्रमामध्ये हेल्मेट वाटप करणो, शाळा, कॉलेजमधील मुलांमध्ये हेल्मेट जागृती करणो, पथनाटय़, व्याख्यान आयोजित करणो, तसेच चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत़ या वेळी रोटरीच्या उपस्थित सदस्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आल़े 

Web Title: Letter to the parent if not helmet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.