‘तुमचा संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल’; माजी मंत्र्यांच्या दोन्ही पुतण्यांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 09:59 IST2024-12-24T09:58:56+5:302024-12-24T09:59:03+5:30

याप्रकरणी ढाेकी पाेलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या अज्ञाताविरुद्ध साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

letter threatening to kill both nephews of former Health Minister Tanaji Sawant has been received | ‘तुमचा संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल’; माजी मंत्र्यांच्या दोन्ही पुतण्यांना धमकी

‘तुमचा संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल’; माजी मंत्र्यांच्या दोन्ही पुतण्यांना धमकी

ढाेकी (जि. धाराशिव) : माजी आराेग्यमंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत यांच्या दाेन्ही पुतण्यांना ठार मारण्याच्या धमकीची चिठ्ठी आली आहे. ‘तुमचा संताेष देशमुख मस्साजाेग केला जाईल’ असा मजकूर त्या चिठ्ठीमध्ये आहे. याप्रकरणी ढाेकी पाेलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या अज्ञाताविरुद्ध साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री दहाच्या सुमारास भैरवनाथ शुगर्स संचालित तेरणा साखर कारखान्याचा ट्रॅक्टर ऊस घेऊन तेरकडून ढाेकी येथे येत हाेता. हा ट्रॅक्टर मुळेवाडी पाटीवर आला असता, दुचाकीवर आलेल्या दाेघांनी ट्रॅक्टर राेखला. यानंतर चालकाजवळ एक बंद पाकीट दिले. ‘हे पाकीट तेरणा कारखान्याच्या गेटवर सुरक्षा रक्षकाकडे दे’ असे म्हणत दाेघेही सुसाट निघून गेले. 

चालकाने पाकीट सुरक्षा रक्षक संजय निपाणीकर यांच्याकडे दिले. त्यांनी पाकीट उघडून पाहिले असता, १०० रुपयांची एक नाेट व चिठ्ठी निघाली. ‘धनंजय सावंत व केशव सावंत यांचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल’, असा मजकूर त्या चिठ्ठीत हाेता. धनंजय सावंत हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, तर केशव सावंत हे तेरणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत.

Web Title: letter threatening to kill both nephews of former Health Minister Tanaji Sawant has been received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.