वृक्ष लागवड करणाऱ्यालाच दाखले; ग्रामसभेचा निर्णय

By admin | Published: May 25, 2017 01:46 AM2017-05-25T01:46:07+5:302017-05-25T01:46:07+5:30

दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रत्येक नागरिकाला वृक्ष लागवड अनिवार्य करण्याचा ठराव येथील शिर्ला ग्रामसभेने घेतला

Letter of tree planter; Gram Sabha decision | वृक्ष लागवड करणाऱ्यालाच दाखले; ग्रामसभेचा निर्णय

वृक्ष लागवड करणाऱ्यालाच दाखले; ग्रामसभेचा निर्णय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला (अकोला) : दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रत्येक नागरिकाला वृक्ष लागवड अनिवार्य करण्याचा ठराव येथील शिर्ला ग्रामसभेने घेतला. या ठरावात वृक्ष लावाल, तरच ग्रामपंचायतीमधील कोणताही दाखला मिळेल, असा ठरावही घेतला.
सरपंच रीना संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली २३ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत ‘एक दाखला, एक झाड’ असा ठराव भारत वृक्ष क्रांतीचे जनक ए. एस. नाथन यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला. वृक्ष लावाल, तरच ग्रामपंचायतमधील दाखला मिळेल, असेही एकमताने ठरले. ज्या नागरिकांना वृक्ष लागवड शक्य नसेल त्यांनी वृक्षरोपणासाठी ५० रुपये ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जमा करावे लागतील. त्या रकमेतून ग्रामपंचायततर्फे संबंधित व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करण्यात येईल. ३५०० वृक्षारोपण करण्याचे ध्येय प्रशासनाचे असल्याचे ग्रामसेवक राहुल उंदरे यांनी सांगितले.

Web Title: Letter of tree planter; Gram Sabha decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.