राज्यांतील संघटना शैक्षणिक प्रश्नांबाबत शिक्षक पाठवणार पंतप्रधानांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 06:28 AM2017-09-18T06:28:35+5:302017-09-18T06:28:37+5:30
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघांशी संलग्नित असलेल्या सर्व राज्यांतील संघटना शैक्षणिक प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना सोमवारी, १८ सप्टेंबर रोजी पत्र पाठवणार आहेत.
मुंबई : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघांशी संलग्नित असलेल्या सर्व राज्यांतील संघटना शैक्षणिक प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना सोमवारी, १८ सप्टेंबर रोजी पत्र पाठवणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधान व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना निवेदन पाठविणार आहेत.
शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी सांगितले की, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून सातव्या वेतन आयोगाची अंमलबाजवणी संपूर्ण देशात केंद्राप्रमाणे करावी, ही प्रमुख मागणी आहे. शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करावे, केंद्र व राज्यामध्ये शिक्षण व्यवस्थेचे नियोजन व नियंत्रणासाठी स्वतंत्र शिक्षण आयोगाची निर्मिती करावी, अशा मागण्या केंद्र स्तरावर प्रलंबित आहेत. तर राज्य पातळीवर १ जानेवारी २००४ पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची प्रमुख मागणी आहे. या मागण्यांची कल्पना पंतप्रधानांसह जावडेकर यांना देण्यात येणार आहे.
मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, राज्यातील शाळांमध्ये कायम नियुक्त्या करून शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या दर्जात सुधारणा करावी. अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे वेतन कोषागारातून व्हावे, अशा मागण्यांचा उल्लेख शिक्षकांमार्फत पंतप्रधानांना पाठवणाºया पत्रात केला जाईल.