आघाडी उदार, मनसे नादार, युती बेजार

By admin | Published: September 13, 2014 11:29 AM2014-09-13T11:29:51+5:302014-09-13T11:30:19+5:30

तेराव्यानंतर शहराचा चौदावा महापौरदेखील आपलाच असावा, हा राज ठाकरे यांचा बालहट्ट अखेर पुरा झाला खरा, पण तो हट्ट पूर्ण करण्याचे सत्कर्म मात्र करावे लागले, शरद पवार आणि माणिकराव ठाकरे यांनाच

Liberal leadership, MNS leader, coalition alliance | आघाडी उदार, मनसे नादार, युती बेजार

आघाडी उदार, मनसे नादार, युती बेजार

Next

हेमंत कुलकर्णी■ नाशिक

तेराव्यानंतर शहराचा चौदावा महापौरदेखील आपलाच असावा, हा राज ठाकरे यांचा बालहट्ट अखेर पुरा झाला खरा, पण तो हट्ट पूर्ण करण्याचे सत्कर्म मात्र करावे लागले, शरद पवार आणि माणिकराव ठाकरे यांनाच. कालपर्यंत मनसेशी राखलेले मैत्र आणि सेनेशी केलेली दुही यात ऐनवेळी अदलाबदल करुन साहसी राजकारण करु पाहणार्‍या भाजपावर तोंडघशी पडण्याची वेळ आली, तर सेनेच्या उमेदवाराचे 'पूर्वचरित्र आणि पूर्वचारित्र्य' याचा धसका घेतलेल्या त्याच्याच काही सहसैनिकांनी निवडणूक निकाल जाहीर होताच, सुटकेचा निश्‍वास टाकला. 
१२२ सदस्यांच्या नाशिक महापालिकेतील त्यातल्या त्यात मोठा पक्ष म्हणजे मनसे. तुलनेत बाकी सारे लहानच. परिणामी, गेल्या काही दिवसात सर्वच पक्षांची दुहेरी तारांबळ. एकीकडे आपला कुणबा सुरक्षित राखायचा व जमलेच तर इतरांच्या तंबूचे कापता येतील तितके कळस कापून आणायचे. यातील दुसर्‍या मोहिमेत शिवसेनेने बरीच मजल मारली होती. काँग्रेसचे काही सदस्य अधिकृतपणे सेनेत दाखल झाले, तर काहींनी बंडखोरीचे निशाण हाती घट्ट धरुन ठेवले. 
शिवसेनेने ज्या उमेदवाराला मनोमन वरले होते, त्या उमेदवाराची कीर्तीच मुळात इतकी दिगंत की त्याच्या केवळ महापौर होण्याच्या कल्पनेने पालिकेतील अधिकारी-कर्मचारी, शहरातील व्यापारी, कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिक यांचे धाबे दणाणून गेले. काहीही करा आणि केवळ आम्हालाच नव्हे, तर शहराला वाचवा, अशी गळ जो तो, ज्याला त्याला घालू लागला. 
अंकगणिताचा विचार करता, मनसे (आता ३७) आणि शिवसेना (आता २९) यांची साथ घेतल्याखेरीज महापौरपदाचे गणित कोणालाही सोडविणे अशक्य होते. भाजपाला (१५) ऐनवेळी आपल्या 'जुन्या करारा'ची आठवण येऊन तिने सेनेशी हातमिळवणी केली. विजयासाठी उर्वरित १८ डोकी गोळा करण्यासाठी सेनेचा घोडेबाजार एकदम तेजीत आला. या घोडेबाजाराने सार्‍यांना खडबडून जाग आली. जोडीला 'त्राही माम, त्राही माम' करणारे नागरिकांचे काही जत्थे होतेच. 
बुधवार रात्रीपासून सार्‍या यंत्रणा गरागरा फिरु लागल्या. काँग्रेस आघाडी (३२), अपक्ष (६) आणि मनसे हे त्रैराशिक जमू शकेल व ते जमले तर युतीला सत्तेपासून दूर ठेवता येईल, हा विचार घट्ट होत गेला. स्थानिक पातळीवर त्यावर शिक्कामोर्तब केले जाऊन शरद पवार, माणिक ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा सुरु झाली. 
वास्तविक पाहता, राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये आपली पावले जी घट्ट रोवली, त्यामागे छगन भुजबळांना लक्ष्य करुन त्यांची प्रच्छन्न अवहेलना करण्याच्या मोहिमेचा फार मोठा हात होता. राजकारणात कुणीही कोणाचा फार काळ मित्र वा शत्रू नसतो, हे कितीही सांगितले जात असले तरी जिव्हारी लागलेले दुखणे असे सहजासहजी विसरले जाऊ शकत नसल्याने, मनसेशी साथसंगत करण्याचा विचारदेखील पचविणे भुजबळांच्या दृष्टीने अशक्यप्राय होते. पण 'साहेबां'च्या निर्णयाबाहेर जाण्याची त्यांची प्राज्ञा होणे नव्हते. परिणामी, गुरुवारी रात्री सारे नक्की झाले आणि जे नक्की झाले त्याचेच प्रत्यंतर पालिका सभागृहात दिसून आले. एकही मत ना इकडचे तिकडे गेले ना तिकडचे इकडे आले. 
अर्थात पवारांनी आणि काँग्रेस पक्षानेही राज ठाकरे यांच्याबाबतीत जे औदार्य दाखविले, त्यामागे आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे आडाखे आहेत, हे काही लपून राहिलेले नाही. एकाच वेळी युतीला बेजार करताना, शिवसेनेच्या उधळलेल्या वारुला लगाम घालायचा, अति महत्वाकांक्षेने गांजलेल्या भाजपाला बेजार करायचे आणि विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला नामोहरम करु शकणार्‍या ुव जेणेकरुन आपला लाभ करवून देणार्‍या मनसेला गोंजारुन घ्यायचे, या बहुमुखी उद्देशात आघाडी सफल ठरली आहे. राजबाबू वा त्याची मनसे आज जरी 'जितं मया'च्या आनंदात आकंठ डुंबत असली तरी, त्यात व्यक्तिगत राज ठाकरे मात्र राजकीयदृष्ट्या चक्क नादार ठरले आहेत. त्यांना नादार ठरविणे, हादेखील पवारांच्या एकूण व्यूहनीतीचाच भाग समजला पाहिजे. नाशिकमध्ये मिळालेल्या घवघवीत यशाच्या जोरावरच राज ठाकरे यांच्या आजवरच्या सार्‍या उड्या होत्या. त्या आता नि:संशय थांबू शकतील. 
या सौदेबाजीतील आघाडीची आणखी एक चतुर खेळी म्हणजे तिने कोणत्याही पदाचा आग्रह न धरता, उप महापौरपद अपक्षांना बहाल केले. म्हणजे आपले दोन्ही हात तसेच मोकळे ठेवले. याचा अर्थ यापुढील अडीच वर्षांच्या काळात या हातांनी टाळी वाजवायची

 

Web Title: Liberal leadership, MNS leader, coalition alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.