कोंडुसकर ट्रॅव्हल्सचा परवाना रद्द

By admin | Published: March 12, 2015 06:04 AM2015-03-12T06:04:58+5:302015-03-12T06:04:58+5:30

कोंडुसकर ट्रॅव्हल्सशी संबंधित गोदामांमध्ये अमली पदार्थांचा साठा आढळून आल्याने या ट्रॅव्हलिंग एजन्सीचा परवाना रद्द करून सखोल चौकशी केली जाईल,

The license of Konduskar Travels cancellation | कोंडुसकर ट्रॅव्हल्सचा परवाना रद्द

कोंडुसकर ट्रॅव्हल्सचा परवाना रद्द

Next

मुंबई : कोंडुसकर ट्रॅव्हल्सशी संबंधित गोदामांमध्ये अमली पदार्थांचा साठा आढळून आल्याने या ट्रॅव्हलिंग एजन्सीचा परवाना रद्द करून सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. त्याचबरोबर मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात सापडलेल्या अमली पदार्थाच्या साठ्याबाबत जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आश्वासनही पाटील यांनी दिले.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनी मेफेड्रोन (एम.डी.) या अमली पदार्थाच्या महाराष्ट्रातील प्रमुख महानगरातील वाढत्या सेवन, विक्रीबाबत लक्षवेधी सूचना दिली होती. त्यावरील चर्चेत शेकापच्या जयंत पाटील यांनी कोंडुसकर ट्रॅव्हल्स ही कंपनी अमली पदार्थांच्या व्यवहारात पुन्हा एकवार सापडली असून यावेळी त्यांच्या गोदामात अमली पदार्थाचा साठा आढळल्याने त्यांचा वाहतूक परवाना रद्द करून चौकशी करण्याची मागणी केली. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी ती तत्काळ मान्य केली. तत्पूर्वी धनंजय मुंडे यांनी मरिन लाइन्स पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार धर्मराज काळोखे यांच्याकडे अमली पदार्थाचा साठा आढळल्याचा मुद्दा उपस्थित केला. वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याखेरीज काळोखे यांनी हे कृत्य केले नसेल. त्यामुळे वरिष्ठांना निलंबित करून चौकशी करण्याची मागणी मुंडे यांनी केली. एमडी या अमली पदार्थाचा नार्कोटिक्स ड्रग अँड सायकोट्रापिक सब्स्टंन्सेस अ‍ॅक्टमध्ये १५ फेब्रुवारी २०१५ रोजी समावेश केला असल्याचे राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: The license of Konduskar Travels cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.