डोमिसाईल असेल तरच फेरीवाला परवाना देणार
By admin | Published: January 4, 2017 12:07 AM2017-01-04T00:07:23+5:302017-01-04T00:07:23+5:30
महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव असल्याचा दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट) असलेल्यांनाच फेरीवाला म्हणून व्यवसाय परवाना देण्याची तरतूद असलेल्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
मुंबई : महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव असल्याचा दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट) असलेल्यांनाच फेरीवाला म्हणून व्यवसाय परवाना देण्याची तरतूद असलेल्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
नवीन धोरणानुसारसर्वेक्षणात आढळलेल्या व नोंदणी झालेल्या पथविक्र ेत्यांना परवान्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहेत. त्यात या प्रक्रि येत अपंग, विधवा आणि एकाकी माता यांना प्राधान्य असेल. सध्याच्या फेरीवाल्यांना शक्यतोवर त्यांच्याच भागात सामावून घेण्याचे प्रयत्न आहेत. मात्र जागेच्या मर्यादेमुळे ते शक्य नसल्यास त्यांना अन्य ठिकाणी सामावून घेण्यात येईल. अशा ठिकाणासाठी जास्त फेरीवाले इच्छूक असल्यास सोडत पद्धतीने जागेचे वाटप करण्यात येईल. पथविक्र ेता प्रमाणपत्र पाच वर्षासाठी वैध असणार आहे ते अहस्तांतरणीय राहणार असून भाड्याने देता येणार नाही मात्र काही विशिष्ट परिस्थितीत कायदेशीर वारसास ते हस्तांतरीत करता येईल.
- फेरीवाल्यांची आणि फेरीवाला क्षेत्राची वर्गवारी करण्यात येणार आहे. त्यात स्थिर, फिरता आणि तात्पुरते असे फेरीवाले असतील.
- फेरीवाला क्षेत्राचेही फेरीवाला क्षेत्र, मर्यादित फेरीवाला क्षेत्र आणि ना फेरीवाला क्षेत्र असे वर्गीकरण असेल. फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यासाठी विविध निकष ठरविण्यात आले आहेत.