अरुण दातेंच्या मुलाच्या नशिबी भिकाऱ्याचे जिणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2016 05:13 PM2016-08-29T17:13:13+5:302016-08-29T17:36:15+5:30

जीवनाला जगण्याची दिशा देणारे गायक अरुण दाते यांच्या मुलाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

The life of Arun's son's beggar | अरुण दातेंच्या मुलाच्या नशिबी भिकाऱ्याचे जिणे

अरुण दातेंच्या मुलाच्या नशिबी भिकाऱ्याचे जिणे

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 29 - जीवनाला जगण्याची दिशा देणारे गायक अरुण दाते यांच्या मुलाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. त्यांचा मुलगा संगीत दाते वाकड पुलाच्या खाली भिकाऱ्याचे जिणे जगत आहे. त्यांना आजाराने ग्रासल्याने त्यांची तब्येत खालावली आहे. एक चांगल्या घरातील ४८ वर्षीय विषय पुरुष वाकड पुलाखाली गेल्या सहा दिवसांपासून बेवारसरीत्या अन्न-पाण्यावाचून पडून असून, त्याची मृत्यूशी झुंज सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलीस नाईक विष्णू नागरे यांना समजली. त्यांनी तात्काळ धाव घेत विचारपूस केली. त्यांना ज्यूस पाजला मात्र ते स्वत:ची ओळख सांगण्यास टाळाटाळ करीत होत.

अखेर विश्वासात घेतल्यानंतर चार दिवसांनी त्यांनी सांगितले की मी दातेंचा लहान मुलगा संगीत आहे, ही बाब नांगरे यांनी तात्काळ लोकमतला कळविली. लोकमत प्रतिनिधीने हा व्यक्ती खरेच अरुण दाते यांचे सुपुत्र आहेत का, याची खातरजमा करून त्यांची माहिती घेतली त्यांच्या पत्नीशी चर्चा केली.


संगीत अरुण दाते असे माझे नाव असून, मी दातेंचा लहान मुलगा संगीत आहे, असे ते म्हणतात. मला मोठ्या भावाने वडिलांच्या संपत्तीतून बेदखल केले आहे. सुमारे तीन वर्षांपासून पत्नी आणि मी विभक्त झालो आहोत. माझा वांद्र्यातील फ्लॅट होता. तो नुकताचा विकला आहे. हॉटेल व्यवसायासाठी मसाल्यांची चौकशी करण्यासाठी मी पुण्यात आलो होतो. जुनी पेठमध्ये जात असताना अज्ञात वाहनाने मला धक्का दिला अन् मी रस्त्यावरच बेशुद्ध पडलो. माझ्या हातातील बॅग माझा, मोबाईल, पाकीट, चेक बुक, एटीएम, बॅगमधील सर्व कागदपत्रे कोणी तरी चोरली.


संगीत म्हणाले, "एका रिक्षा चालकाने १०८ ला फोन करून मला मदत केली. ससूनमध्ये दाखल झालो, तिथे २० दिवस उपचार घेतले. अन् त्यानंतर मी तिथून इथपर्यंत कसा आलो हे मला माहीत नसल्याचे सांगतात. मात्र जेव्हा इथे आलो तेव्हा रिक्षातून तिघा-चौघांनी मला बळजबरीने ढकलून इथे टाकल्याने पायाला जखम झाली आहे. त्यामुळे मी जोरजोरात रडत असताना मला एका भिकाऱ्याने चादर आणि अंथरायला दिले." 
याबाबत संगीत दाते यांच्या पत्नी मेदीनी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी त्यांचा संगीत यांच्याबरोबर घटस्फोट झाला आहे. त्यांच्याशी माझा काही संबध नसल्याचे सांगितले. याबाबत अतुल दाते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "संगीत यांच्यामुळे कुटुंबीयांना खूप त्रास झाला आहे. त्याचे वागणे बरोबर नाही. त्यामुळे त्याला कुटुंबापासून खूप वर्षापूर्वी कायदेशीर प्रक्रिया करून विभक्त केले आहे."

Web Title: The life of Arun's son's beggar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.