बाबांचे जीवन ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण

By admin | Published: July 1, 2014 12:13 AM2014-07-01T00:13:42+5:302014-07-01T00:13:42+5:30

बाबा आमटे हे ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण आयुष्य जगले, असे त्यांचे पुत्र आणि ज्येष्ठ समाज कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे सांगितले.

Life of Baba B: In this sense, the characteristic | बाबांचे जीवन ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण

बाबांचे जीवन ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण

Next
>पुणो : घरची जमीनदारी असतानाही कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन उभारणारे आणि योग्य वेळ येताच कामातून निवृत्त होऊन नव्या पिढीला संधी द्यायचा मोठेपणा दाखवणारे बाबा आमटे हे ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण आयुष्य जगले, असे त्यांचे पुत्र आणि ज्येष्ठ समाज कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे सांगितले.
माहेर-महिला प्रतिष्ठानतर्फे आनंदवन महारोगी सेवा समिती आणि हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प यांना सोमवारी पुरस्कार देण्यात आला. या दोन्ही संस्थांच्या वतीने डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांनी हा पुरस्कार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते स्वीकारला. त्या वेळी आमटे बोलत होते. के. आर. पाटील आणि सुनंदा पाटील यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.  सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी. बी. सावंत, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे उपस्थित होते. 
डॉ. आमटे म्हणाले, ‘‘रस्त्याच्या कडेला दिसलेला कुष्ठरोगी बघून बाबांनी त्यांच्यासाठी काम करायचा निर्णय घेतला. त्यासाठी जमीनदारी, सगळे ऐशोराम सोडले. आनंदवनात रुग्णांबरोबर निरोगी लोकांनाही शिकता यावे, यासाठी त्यांनी महाविद्यालय सुरू केले. अशा प्रकारचे हे पहिले उदाहरण असावे. या आजाराबद्दलच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी बाबांनी हा उपाय योजला होता. सुरुवातीला तिथे निरोगी मुले यायला बिचकायची. आम्हा दोघांचे शिक्षण तिथेच झाले. नंतर मात्र इथे शिकायला गर्दी होऊ लागली. कुठे थांबायचे, हेही बाबांना नेमके कळले होत. मी भामरागडची आणि विकासने आनंदवनाची जबाबादारी घेतल्यावर त्यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही. उलट ते नर्मदा परिक्रमेसाठी जाऊन राहिले होते. आम्हीही सध्या मुलांकडे जबाबदारी सोपवून हाच कित्ता गिरवायचा प्रयत्न करत आहोत. 
आनंदवन आणि हेमलकसा प्रकल्प हे बाबांच्या तपश्चर्येला आलेले फळ आहे, असे श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. यासाठी आपल्याला जे देता येते ते देऊन चांगल्या कामाला हातभार लावावा, असेही ते म्हणाले. 
पटवर्धन दांपत्याने 1 लाख, 11 हजार, 1क्1 रुपयांची देणगी डॉ. आमटे यांना दिली. जिजाबाई मोडक, विजय मेटे, तसेच कलाकार पार्थ भालेराव आणि गौरी गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानच्या विद्या म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. निकिता म्हात्रे यांनी आभार मानले.  
(प्रतिनिधी)
 
अनिष्ठ प्रथांविरोधात समाजकार्यच हवे
4वारसाहक्काने राजकारण, व्यवसाय करणारी माणसे असतात. मात्र, समाजकार्याचा वारसा चालवणो हे आमटे परिवाराचे उदाहरण दुर्मिळ असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख पी. बी. सावंत यांनी केला. अनिष्ट प्रथा सत्तेच्या जोरावर नष्ट करता येत नाहीत, त्यासाठी समाजकार्यच करावे लागते. त्यामुळे सामाजिक संस्थांना जगवणो हे आपले काम असल्याचे त्यांनी सांगितले. समाजकारणाचे गुण राजकारणात आले, तर देशाची उन्नती होईल, असेही  आमटे म्हणाले. 
 
अजून मने जोडली गेली नाहीत
4सिक्कीम भारताला भौगोलिकदृष्टय़ा जोडले गेले असले, तरी या दोन्ही ठिकाणची मने एकत्र आलेली नाहीत. त्यासाठी सिक्कीम आणि इतर भारतीयांनी एकमेकांकडे जायला हवे, अशी टिप्पणी श्रीनिवास पाटील यांनी केली.

Web Title: Life of Baba B: In this sense, the characteristic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.