हत्येच्या आरोपातून सुटका झालेल्यास २२ वर्षांनी जन्मठेप
By admin | Published: May 24, 2017 03:19 AM2017-05-24T03:19:40+5:302017-05-24T03:19:40+5:30
हत्येचा आरोप असलेल्याची निर्दोष सुटका करण्याचा कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने तब्बल २२ वर्षांनंतर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हत्येचा आरोप असलेल्याची निर्दोष सुटका करण्याचा कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने तब्बल २२ वर्षांनंतर
रद्द करीत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तीन महिन्यांत त्याला न्यायालयात शरणागती पत्करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले. २५ जानेवारी १९९५ रोजी कोल्हापूर सत्र न्यायालयाने कृष्णनाथ बाबूराव पाटील याची हत्येच्या आरोपातून निर्दोष सुटका केली. मात्र या निर्णयाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले. १९९५पासून हे अपील उच्च न्यायालयात
प्रलंबित होते. अखेरीस १५ मे २०१७ रोजी उच्च न्यायालयाने या अपिलावरील सुनावणी पूर्ण करीत कृष्णकांत याला हत्येप्रकरणी दोषी ठरवले. यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावत तीन महिन्यांत न्यायालयापुढे शरणागती पत्करण्यास सांगितले. तीन
महिन्यांत आरोपी न्यायालयात हजर राहिला नाही, तर कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढावे, असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. आरोपीला कोणत्या आधारावर जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे, याची कारणमीमांसा स्वतंत्रपणे देऊ, असे उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.