बलात्कार प्रकरणातील चौघा नराधमांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:06 AM2017-12-28T04:06:06+5:302017-12-28T04:06:19+5:30
नागपूर : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाºया चार नराधम आरोपींना मकोका कायद्याच्या विशेष न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
नागपूर : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाºया चार नराधम आरोपींना मकोका कायद्याच्या विशेष न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना २४ मे २०१५ रोजी रात्री टीबी वॉर्ड परिसरातील निर्जन भागात घडली होती. आरोपींना ९० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून, त्यातील ५० हजार रुपये पीडित मुलीला देण्याचा आदेश न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी दिला.
गणेश रामदास सातपुते (२७), करुणानंद रमेश मून (२७), रोहित संजय तांबे (२७) व नितीन प्रीतम बैरीसाकू (२८) अशी आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी इंदिरानगर येथे आई, वडील व दोन बहिणींसोबत राहात होती. ती सक्करदरा येथे एका डेव्हलपर्सच्या कार्यालयात काम करीत होती. घटनेच्या दिवशी घरी परतत असताना तिला क्रीडा चौकात तिचा मित्र राहुल ऊर्फ आदित्य ऊर्फ रियांश रमेश निनावे भेटला. त्यामुळे दोघेही मिळून घराकडे जात होते. दरम्यान, टीबी वॉर्ड परिसरात आरोपींनी त्यांना थांबवले. त्यांनी निनावेला शिवीगाळ व मारहाण करून हाकलून लावले. त्यानंतर मुलीला निर्जनस्थळी नेऊन सामूहिक बलात्कार केला. याबद्दल वाच्यता केल्यास आई-वडिलांना ठार मारून टाकू, अशी धमकीही मुलीला दिली होती. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील विजय कोल्हे यांनी बाजू मांडली.
>अत्याचार प्रकरणात तिघांना कारावास
अमरावती : दहावीच्या परीक्षेला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन प्रकरणांमध्ये दोघांना दहा वर्षांची, तर त्यांना मदत करणाºया एकाला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. राहुल ऊर्फ गोलू राजू रावेकर (२४), संदीप रामदास रावेकर (२४), मंगेश विष्णू कुकडे (२४) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. खोलापूर (ता.भातकुली) येथील १५ वर्षीय मुलगी २४ मार्च २०१४ रोजी दहावीच्या पेपरसाठी गेली होती. मंगेश कुकडेने तिला पळवून अकोला येथे राहुलजवळ पोहचविले. राहुलने तिला अहमदाबादला नेऊन तेथे लैंगिक अत्याचार केले.