पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2016 07:21 PM2016-10-26T19:21:57+5:302016-10-26T19:42:23+5:30
पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल बुधवारी खामगाव न्यायालयाने दिला.
Next
>ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 26 - पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल बुधवारी खामगाव न्यायालयाने दिला. जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव गड येथील अर्जुन अभिमन्यू तायडे याने १ एप्रिल २०१३ रोजी पत्नीवर विळ्याने वार करून तिची हत्या केली. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी अर्जुन तायडे विरूध्द कलम ३०२, ४९८ भादंविनुसार गुन्हा दाखल केला व प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक तडवी यांनी केला. याप्रकरणी खामगाव न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष व सरकारी अभियोक्ता उदय आपटे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश कोर्ट नं.२ चे डि.डी. ममदापुरे यांनी आरोपी अर्जुन तायडे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.