समाजाच्या आरोग्यासाठी जीवन वेचणा-या डॉ. राणी बंग

By admin | Published: March 8, 2017 03:09 PM2017-03-08T15:09:09+5:302017-03-08T15:09:09+5:30

सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात डॉ. अभय बंग हे नाव आज एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे घेतलं जातं. या दीपस्तंभालाही दिशा दाखवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते डॉ. राणी बंग यांनी

Life Insurance for the Health of the Society Queen bung | समाजाच्या आरोग्यासाठी जीवन वेचणा-या डॉ. राणी बंग

समाजाच्या आरोग्यासाठी जीवन वेचणा-या डॉ. राणी बंग

Next

ऑनलाइन लोकमत

सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात डॉ. अभय बंग हे नाव आज एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे घेतलं जातं. या दीपस्तंभालाही दिशा दाखवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते डॉ. राणी बंग यांनी. आपलं सारं आयुष्य या डॉक्टर दाम्पत्यानं सार्वजनिक आरोग्यासाठी वाहून घेतलं. आपल्या ‘सर्च’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गडचिरोलीसारख्या अतिमागास आणि आदिवासी भागातून कार्य सुरू केलं. पण त्याचा विस्तार आज देशपातळीच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलं आहे. बालमृत्यू रोखण्याचं त्यांचं मॉडेल आज ‘युनिसेफ’नंही उचलून धरलंय. त्यामुळेच जन्माला येण्यापूर्वीच किंवा जन्म घेताच जगाचा निरोप घेणारी अनेक बालके आज मुक्तीचाच नव्हे तर स्वातंत्र्याचाही श्वास घेत आहेत. 

राणी बंग यांची वैद्यकीय शिक्षणातील कारकीर्द हेवा वाटण्याजोगी लखलखीत होती. प्रसूतिशास्त्र म्हणजे गायनॅकॉलॉजीत एम.डी. ला गोल्ड मोडल मिळविणाऱ्या राणी यांना घसघशीत पैसा मिळवून देणाऱ्या मार्गाचा मोह झाला नाही. त्याऐवजी त्यांनी बाळंतपण आणि त्याच्याही पल्याड असलेल्या महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर काम करून समाजऋण फेडण्यात धन्यता मानली. स्त्री रोगाचे एक भयानक अवजड ओझे ग्रामीण महिला कसे हकनाक अंगावर वागवत आहेत, हे सर्वात आधी जगाला सप्रमाण दाखवून दिले, ते राणी बंग यांनी. 

 
ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांचे आरोग्यविषयक प्रश्न, सेक्सच्या निमित्ताने अज्ञानापोटी मिळणारे रोग, बाळंतपणाच्या समस्या, आरोग्यातील व्यक्तिगत स्वच्छता इथपासून सेक्स एज्युकेशन, एड््स नियंत्रण अशा अनेकानेक क्षेत्रात काही दशके झोकून देऊन केलेल्या यांच्या कामाची देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा दखल घेतली गेली. पण राणी बंग यांची ही लढाई प्रतिष्ठा आणि पुरस्कारांसाठी कधीच नव्हती. विज्ञान-तंत्रज्ञानाची मधुर फळं तळागाळातल्या महिलांनाही चाखता यावीत, ज्यातून त्यांचे आरोग्य व एकूणच जगण्याचा पोत सुधारेल, या इच्छेतून राणी बंग यांचे काम आकाराला आले आहे.
 

 

Web Title: Life Insurance for the Health of the Society Queen bung

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.