बेड न मिळाल्याने रुग्णवाहिकेतच सोडला जीव; बारा तास झिजविले रुग्णालयांचे उंबरठे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 04:06 AM2020-09-15T04:06:09+5:302020-09-15T06:46:43+5:30

कंधार तालुक्यातील दिग्रस बु़ येथील बालाजी वसंतराव चिद्रावार (६८) यांची अँटिजेन तपासणी करण्यात आली होती.त्यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतु, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रविवारी दुपारी दीड वाजता नातेवाइकांनी रुग्णवाहिकेतून त्यांना नांदेडला आणले होते.

Life left in ambulance due to lack of bed; Thirteen hours of worn-out hospital thresholds | बेड न मिळाल्याने रुग्णवाहिकेतच सोडला जीव; बारा तास झिजविले रुग्णालयांचे उंबरठे

बेड न मिळाल्याने रुग्णवाहिकेतच सोडला जीव; बारा तास झिजविले रुग्णालयांचे उंबरठे

Next

नांदेड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ११ हजारांच्या पुढे गेल्यामुळे सर्वच रुग्णालये हाउसफुल्ल झाली आहेत़ नॉन कोविड रुग्णाला तब्बल बारा तास फिरूनही बेड न मिळाल्याने रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकेतच मध्यरात्री आपला जीव सोडावा लागला़ हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री शहरात घडला.  जिल्ह्यात दररोज तीनशेहून अधिक कोरोनाबाधित आढळतआहेत. त्यातच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांत बेड मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. यात कोरोना रुग्णांबरोबर इतर आजारांच्या रुग्णांचीही ससेहोलपट होत आहे. कंधार तालुक्यातील दिग्रस बु़ येथील बालाजी वसंतराव चिद्रावार (६८) यांची अँटिजेन तपासणी करण्यात आली होती़ त्यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला़ परंतु, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रविवारी दुपारी दीड वाजता नातेवाइकांनी रुग्णवाहिकेतून त्यांना नांदेडला आणले होते़
शहरातील प्रत्येक रुग्णालयात ते गेले़ परंतु सर्वांनी एकही बेड शिल्लक नसल्याचे सांगितले.शेवटी विष्णुपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेले़, परंतु या ठिकाणीही बेड मिळाला नाही़ दुपारपासून रुग्णवाहिकेत असलेले बालाजीराव वेदनेने विव्हळत होते़ शेवटी त्यांनी रात्री अडीचच्या सुमारास रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकेत शेवटचा श्वास घेतला़

डॉक्टरांना बोलवा हो़़़
दुपारी दीडपासून रुग्णवाहिकेत असलेल्या बालाजीराव यांची प्रकृती तासागणिक ढासळत चालली होती़ त्यातच डॉक्टरला बोलवा हो़़़मला उपचाराची गरज आहे, असा टाहो ते फोडत होते़ परंतु नातेवाईकही हतबल होते़ अश्रू गाळण्याशिवाय त्यांच्याकडेही पर्याय नव्हता़

Web Title: Life left in ambulance due to lack of bed; Thirteen hours of worn-out hospital thresholds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.