युवतीला जीवदान देणारी शस्त्रक्रिया लिम्का बुकमध्ये

By admin | Published: July 23, 2014 03:14 AM2014-07-23T03:14:32+5:302014-07-23T03:14:32+5:30

ट्रॅक्टरमधून प्रवास करताना झालेल्या अपघातात युवतीच्या मेंदूत घुसलेले हूक काढून तिला जीवदान देणा:या शस्त्रक्रियेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची माहिती डॉ. राहुल मोदगी यांनी दिली.

Limca Bookkeeping Surgery | युवतीला जीवदान देणारी शस्त्रक्रिया लिम्का बुकमध्ये

युवतीला जीवदान देणारी शस्त्रक्रिया लिम्का बुकमध्ये

Next
नाशिक : ट्रॅक्टरमधून प्रवास करताना झालेल्या अपघातात युवतीच्या मेंदूत घुसलेले हूक काढून तिला जीवदान देणा:या शस्त्रक्रियेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची माहिती डॉ. राहुल मोदगी यांनी दिली. 
श्रीरामपूरमध्ये दीड वर्षापूर्वी पल्लवी (17) या युवतीला ट्रॅक्टरची धडक बसून सुमारे 15 सेंटिमीटर लांबीचा हूक तिच्या मेंदूत साधारणपणो 1क् सेंटिमीटर आत घुसला होता. मेंदूतील हूक काढण्याची अवघड शस्त्रक्रिया डॉ. राहुल मोदगी यांनी शिर्डीतील साई संस्थान हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणो पार पाडली. तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेत हूक बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केल्याचे डॉ. मोदगी यांनी सांगितले. मात्र त्यानंतर तिला अर्धागवायूचा सामना करावा लागला. पाच महिन्यांनी नाशिकच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये कवटीचा संबंधित भाग जोडण्याची शस्त्रक्रिया डॉ. मोदगी यांच्या मार्गदर्शनाखाली केल्याने तिला जीवदान मिळाले. (प्रतिनिधी) 

 

Web Title: Limca Bookkeeping Surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.